जंगलामध्ये आदिवासी लोक सापांपासून कसा वाचवतात आपला जीव? वापरतात ही खास ट्रिक, साप पुन्हा जवळ सुद्धा येत नाही

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, यातील काही प्रजाती या विषारी आहेत, तर काही सापांच्या जाती बिनविषारी आहेत. परंतु आपण लहानपणापासूनच साप विषारी असल्याचं ऐकत आलेलो असतो, त्यामुळे आपण अनेकदा आपल्याला कुठेही साप दिसला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करतो.

जंगलामध्ये आदिवासी लोक सापांपासून कसा वाचवतात आपला जीव? वापरतात ही खास ट्रिक, साप पुन्हा जवळ सुद्धा येत नाही
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 8:09 PM

भारतामध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते, यामध्ये लाखो प्रजातींचे प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक अशा विविध घटकांचा समावेश आहे. प्रत्येकाचं वैशिष्ट्य देखील वेगळं आहे. साप हा देखील या जैवविविधतेमधला प्रमुख घटक आहे. सापांमुळे त्या परिसरातील उंदीर, बेडूक, या सारख्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होतं. कारण या सारखेच प्राणी सापांचं मुख्य अन्न असतं. सापांना शेतकर्‍यांचा मित्र देखील म्हटलं जातं. कारण सापांमुळेच उंदरांची संख्या नियंत्रणात राहते, आणि पिकांचं संरक्षण होतं. त्यामुळे ज्या भागात सापांची संख्या कमी असते, अशा भागांमध्ये आपोआप उंदरांची संख्या वाढते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी देखील होते. साप उंदरांना खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो. मात्र असं जरी असलं तरी देखील काही सापांच्या प्रजाती या प्रचंड विषारी असतात, अशा सापांपासून आपलं संरक्षण होणं गरजेचं असतं. विषारी सापांमध्ये फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग या चार प्रमुख प्रजातींचा समावेश होतो.

जे लोक जंगल भागात राहतात, किंवा ग्रामीण भागांमध्ये मातीच्या घरात राहतात, अशा लोकांना तुलनेनं सापांचा धोका अधिक असतो. कारण अशा प्रदेशात सापांचा वावर हा अधिक असतो. सापांपासून संरक्षण व्हावं, यासाठी आदिवासी लोक एक खास ट्रिक वापरतात. यामुळे साप त्यांच्या घराच्या आसपास देखील फिरकत नाहीत, आणि त्यांचं सापांपासून संरक्षण होतं. भारतामध्ये हजारो प्रकारच्या सापांच्या प्रजाती आढळून येतात, परंतु त्यापैकी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सापाच्या प्रजाती या विषारी असतात.

Loading...

जे लोक जंगल भागात किंवा शेतात राहतात ते काय करतात, आपल्या घरामध्ये साप शिरू नये, यासाठी आपल्या घराच्या चारही बाजुने बोरीच्या किंवा बाभळीच्या फांद्यांचं कुंपण करतात. बोरीला आणि बाभळीला तीक्ष्ण काटे असतात.सापांची त्वचा ही खूप सेंसिटिव्ह असल्यामुळे त्यांना या काट्याचा त्रास होतो, त्यामुळे ते कधीही अशा ठिकाणी येत नाहीत. त्यामुळे घराचं सापांपासून संरक्षण होतं.

एवढंच नाही तर ते रात्री झोपताना देखील कधीही खाली जमिनीवर झोपत नाहीत, तर ते झोपण्यासाठी बाज किंवा पलंगाचा वापर करतात. ज्यामुळे त्याचं सापांपासून संरक्षण होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us