राष्ट्रवादी अजित पवार गटात घडामोडींना वेग, प्रशांत किशोर यांच्या टीमसोबत मॅरेथॉन बैठक, नेमकं काय ठरलं?
मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीच्या अनुषंगाने शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमची खासदार पार्थ पवार यांच्यासोबत ४ तास मॅरेथॉन बैठक सुरू होती.

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीच्या अनुषंगाने शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमची खासदार पार्थ पवार यांच्यासोबत ४ तास मॅरेथॉन बैठक सुरू होती. बैठकीला प्रशांत किशोर ऑनलाइन उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत महायुतीत शिवसेना आणि भाजप सोबत कशा प्रकारे समन्वय साधायचा? त्यात पक्षाची भूमिका काय असावी याबाबत चर्चा झाली आहे? पक्षाने सोशल मीडिया आणि माध्यमांशी संवाद साधताना समन्वयाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे.
पक्षाकडून आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यावर प्रशांत किशोर यांच्या टीमसोबत चर्चा करणे तसेच त्यांची आर्थिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मागील ४ महिने प्राथमिक तत्वावर सुरू असलेले काम आता प्रशांत किशोर यांची टीम पूर्णपणे पाहणार आहे, यासाठी नुकतीच पक्षाकडून एक मोठी रक्कम प्रशांत किशोर यांच्या टीमला वर्ग करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान एकीकडे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काम प्रशांत किशोर यांची टीम पाहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी प्रशांत किशोर यांच्या टीमला नुकतीच पक्षाकडून एक मोठी रक्कम देखील वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल कशी असणार? पक्षांतर्गत काय बदल केले जाणार? महायुती म्हणून काय निर्णय घेतले जाणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनिकरणाची चर्चा देखील मधून मधून सुरूच आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून राष्ट्रवादी अजिक पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाहीये. एकीकडे विलनिकरणाची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काम प्रशांत किशोर यांची टीम पहाणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमची खासदार पार्थ पवार यांच्यासोबत ४ तास मॅरेथॉन बैठक झाली, अशी माहिती आता समोर येत आहे.
