Liquor: दारूची पण असते एक्स्पायरी डेट? किती दिवस टिकते मद्य, काय सांगतात तज्ज्ञ?
Liquor knowledge: दारु पिताना ती कधी खराब होते, होऊ शकते हा विचार कधी तुम्हाला शिवला का? तुमच्या मनात आला का? पण दारू खराब होते. ते ओखण्यासाठी तज्ज्ञांनी काय दिला आहे सल्ला?

Liquor knowledge: वाईन, व्हिस्की, रम, व्होडका, बिअर, देशी अशा अनेक प्रकारची दारू उपलब्ध आहे. पण तळीरामांना हे माहिती नसते की एकदा दारुची बॉटल उघडल्यानंतर ती किती काळ टिकते? मद्यपींना हे वाचून आनंद होईल की सीलबंद बॉटलमधील दारू ही अनेक दिवस टिकते. तर एकदा उघडलेली दारूची बॉटलीही अनेक दिवस चांगल्या स्थितीत राहते. त्यातील दारू लागलीच खराब होत नाही. पण वाईन आणि बिअर जास्त काळ टिकत नाही. बॉटल उघडल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यात वाईन, बिअर पिणे चांगले मानले जाते. नाहीतर हे मद्य तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरते. कारण त्यात बारीक किडे होऊ शकतात. या मद्याची चव बदलते. वास येतो. ती जर प्राशन केल्या गेली तर मात्र विषबाधा होण्याची शक्यता असते.
दारू किती काळ टिकते ?
बॉटल उघडल्यानंतर दारू दोन वर्षांपर्यंत चालते. व्हिस्की, व्होडका, टकीला, ब्रँडी, जिन आणि रम यामध्ये अल्कोहलची मात्र अधिक असते. साखरेचे प्रमाण कमी असते. या बॉटलीचा आकार आणि अल्कोहलचे प्रमाण यामुळे जीवाणू , कीडे होत नाही. जर बॉटल उघडली तरी ऑक्सिकरणची प्रक्रिया लवकर सुरू होत नाही. आरोग्यासाठी मोठी जोखीम नाही. पण ऑक्सिकरण झाल्यास चव आणि रंग बदलू शकतो. दारूची बॉटल 12 ते 18 महिन्यात संपवण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही.
दारू तयार करण्याची प्रक्रिया महत्त्वाची
दारु तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. त्यावर दारू किती काळ टिकते हे अवलंबून असते. कधी कधी दारूचा वास जातो. रंग उडतो. स्कॉच अथवा जिन जास्त काळ टिकत असली तरी एका मर्यादेनंतर तिची सुद्धा चव बदलते. बिअर, वाईन अथवा इतर प्रकारच्या दारू तयार करताना विविध साहित्य आणि प्रक्रियांचा वापर होतो. फर्मेंटेशन ही मूळ प्रक्रिया असते. पण त्यानंतर दारू किती दिवसानंतर पिण्यात आली. झाकण उघडल्यानंतर ती किती दिवस तशीच होती या गोष्टीवरही काही गोष्टी अवलंबून असतात.
दारू खराब झाली कशी ओळखणार?
वाईन, बिअर खराब झाली हे चव चाखल्यावर लागलीच कळते. सूर्यप्रकाशामुळे वाईनची चव जाते. तिची चव बिघडते. हवा आत शिरल्याने वाईनची चव बदलते. वाईनचा एक थेंब घेतल्यावरच चवीचा अंदाज बांधता येतो.
वाईनाचा रंग बदलतो. रेड वाईन तपकिरी दिसते. तर व्हाईट वाईन ही पिवळी झालेली दिसते. त्यामुळे वाईनचा बदलेला रंगही तुम्हाला ती खराब झाल्याचे संकेत देतो.
वाईन, बिअरचा वासही ती खराब झाली की नाही हे सांगतो. वाईन अथवा मद्याच्या बॉटलचे पहिल्यांदा झाकण उघडल्यावर एक ताजेपणा जाणवतो. पण मद्य खराब झाल्यावर खराब वास येतो. उग्र दर्प येतो.