सापांना घरापासून दूर कसं ठेवायचं? फक्त ही एक वस्तू घरात ठेवा पुन्हा आयुष्यात साप येणार नाही

अनेकदा साप आपल्या घरात देखील घुसतात. अचानक समोर साप दिसल्यानंतर भीती वाटनं साहाजिक आहे. परंतु अशा काही गोष्टी आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर तुमच्या घरात कधीही साप शिरणार नाहीत.

सापांना घरापासून दूर कसं ठेवायचं? फक्त ही एक वस्तू घरात ठेवा पुन्हा आयुष्यात साप येणार नाही
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 9:25 PM

अनेकदा असं होतं की अचानक आपल्या घरात साप घुसतात, यातील काही साप हे बिनविषारी असतात परंतु काही साप हे विषारी देखील असू शकतात. बऱ्याचवेळा घरातील टॉयलेट बाथरूममध्ये देखील साप आढळून येतात. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की साप अचानक घरात कसे येतात? जर साप घरात आले तर त्यांना बाहेर काढण्यासाठी काय करावं? काही दिवसांपूर्वी अकोल्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली होती, थेट कमोडमध्ये विषारी कोबरा साप शिरला होता. सापांना जास्त आर्द्रता असलेलं वातावरण आवडतं, तसेच तुमच्या घराच्या परिसरात जर दाट झाडी असतील किंवा गवत वाढलेलं असेल तरी देखील तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला सारखे साप दिसू शकतात. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवणं, कुठेही राडा होणार नाही याची काळजी घेणं हाच आहे.

काही विशिष्ट वास असे असतात ज्यांचा सापांना त्रास होतो. या वस्तू जर तुमच्या घरात असतील तर साप शक्यतो घरात शिरत नाहीत. अशा घरांपासून साप दूरच राहणं पसंत करतात. ज्यामध्ये अनेक मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश होतो. ज्यामध्ये लसून, कांदा, लवंग, दालचिनी या मसाल्यांच्या पदार्थांच्या वासामुळे साप शक्यतो घरात घुसत नाही. याचबरोबर फिनेल, केरोसीन, स्नेक अवे पावडर या सारखे पदार्थ जर तुम्ही घरात ठेवले तरी देखील साप अशा घरात येत नाहीत. टॉयलेटमध्ये फिनेल ठेवलं तर बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये साप घुसणार नाहीत.

Loading...

समजा जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला इजा होईल असं काहीही करू नका, काही ठिकाणी सापांच्या अंगावर रॉकेल किंवा पेट्रोल टाकलं जातं, परंतु यामुळे सापाला त्रास होऊ शकतो. जर समजा तुम्हाला कुठेही साप आढळला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, किंवा त्याला कुठल्याही प्रकारची इजा होईल असंही काही काम करू नका, त्या परिसरात जे सर्पमित्र आहेत, त्यांना याची माहिती द्या. ते सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतील.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us