AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hyderabad Fire | भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबादमधील (Hyderabad) बोयागुडा भागात भंगाराच्या गोदामाला आग (Fire) लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. या आगीत 11 जण जिवंत जळल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मूळ बिहारहून आलेल्या मजुरांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

Hyderabad Fire | भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबादमधील बोयागुडा येथे लागलेल्या आगीमध्ये 11 कामगारांचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9
| Updated on: Mar 23, 2022 | 11:25 AM
Share

हैदराबाद : हैदराबादमधील (Hyderabad) बोयागुडा भागात भंगाराच्या गोदामाला आग (Fire) लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. या आगीत 11 जण जिवंत जळल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मूळ बिहारहून आलेल्या मजुरांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. 11 जणांचा या आगीमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. यावरून हे समजते की, आग किती जास्त भीषण होती. आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पहाटे 3 वाजता आग लागली होती. त्यानंतर पोलिस आणि अग्नी शामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदत कार्य करण्यास सुरूवात झाली.

गोदामाला आग लागल्यामुळे 11 कामगारांचा मृत्यू

माहितीनुसार घटनेच्या वेळी हे सर्व कामगार गोदामात झोपले होते. आग इतकी जास्त भीषण होती की, गोदामामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे देखील शक्य झाले नाही. विशेष म्हणजे या आगीमधून फक्त एकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. माहितीनुसार, आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. गोदामात काम करणारे सर्व मजूर बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे.

इथे पाहा ANI केलेले Tweet

पहाटे 3 वाजता गोदामाला लागली आग

पहाटे 3 वाजता गोदामाला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. गोदामामध्ये 12 मजूर झोपल्याची माहिती पोलिसांकडे होती. आग पहिल्या मजल्यावर लागली होती आणि मजूर दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. पोलिसांनी आणि अग्नी शामक दलाने मजूरांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, भिंत कोसळल्यामुळे मजूरांना वाचवता आले नसल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या : 

Kolhapur : हत्येतला आरोपी गावात आला अन् राडा झाला, कागलमध्ये पोलीसांवरही दगडफेक, सोनाळीत झालं काय?

CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली