Kolhapur : हत्येतला आरोपी गावात आला अन् राडा झाला, कागलमध्ये पोलीसांवरही दगडफेक, सोनाळीत झालं काय?

कागल तालुक्यातील सोनाळी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनाळी ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये दहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. 

Kolhapur : हत्येतला आरोपी गावात आला अन् राडा झाला, कागलमध्ये पोलीसांवरही दगडफेक, सोनाळीत झालं काय?
पोलिसांवर दगडफेक
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 9:57 AM

कोल्हापूर :  कागल (kagal) तालुक्यातील सोनाळी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनाळी ग्रामस्थांकडून पोलिसांवर (Police) दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये दहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री पोलिसांवर दगडफेक (Stone throwing at police) करण्यात आली.  वरद पाटील खून प्रकरणातील संशयित पुन्हा गावात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. आक्रमक ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत पोलिसांसोबतच वरद पाटील याचे नातेवाईक देखील गंभीर जखमी झाले आहेत, 18 ऑगस्ट 2021 ला वरद पाटील यांच्या हत्येचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर  या प्रकरणातील संशयीत मारुती वैद्य याला गावात न येऊ देण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला होता. मात्र तरी देखील या हत्याकांडातील संशयीत आरोपी मारुती वैद्य हा गावात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 18 ऑगस्ट 2021 ला वरद पाटील यांच्या हत्येचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर या खूनातील संशयित आरोपी मारुती वैद्य याला गावात न येऊ देण्याचा निर्णय सोनाळी ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र मारुती वैद्य पुन्हा गावात आल्याने ग्रामस्थांचा राग अनावर झाला. रागाच्या भरात ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिसांसह वरद पाटील यांचे नातेवाईक देखील जखमी झाले आहेत. पोलिसांच्या हाताला, तसेच डोक्याला आणि डोळ्याला इजा झाली आहे.

गावात तणावपूर्ण शांतता

पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर सोनाळी गावात तणावपूर्ण शांतता आहे. संतप्त ग्रामस्थांकडून मंगळवारी रात्री पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. मारूती वैद्य गावात आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला, संतापाच्या भरात दगडफेक झाली, घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान

Ratnagiri Murder | तू माझा मुलगा नाहीस, 17 वर्षीय मुलाला बापाने हिणवलं, लेकाने जीवच घेतला

Amravati | मुख्याध्यापकाने शाळेतच 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचे केस कापले, Bad Touch केल्याचाही आरोप

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.