ICSE 10th Result 2022: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; आज जाहीर होणार ICSE बोर्डाचा निकाल

ICSE इयत्ता 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. ICSE चा निकाल 17 जुलै रोजी संध्याकाळी 05 वाजता अधिकृत वेबसाइटवर जाहीर होणार आहे.

ICSE 10th Result 2022: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; आज जाहीर होणार ICSE बोर्डाचा निकाल
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 12:03 AM

काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) ICSE इयत्ता 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. ICSE चा निकाल आज 17 जुलै रोजी संध्याकाळी 05 वाजता अधिकृत वेबसाइटवर जाहीर होणार आहे. बोर्डाने नोटीस बजावून त्याबाबतची माहिती दिली आहे. निकालाची तारीख घोषीत झाल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरुन रिझल्ट डाऊनलोड करुन शकतात.

ICSE दहावीच्या 2022 परीक्षेचा निकाल रविवार, 17 जुलै रोजी संध्याकाळी 5:00 वाजता लागणार असल्याचे बोर्डाकडून परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी हा निकाल CISCE च्या CAREERS पोर्टलवर, वेबसाइटवर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना SMS द्वारे देखील रिझल्टची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रही परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होकी. सेमिस्टर 1 आणि सेम 2 अशा दोन सत्रात परीक्षा झाली.   सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 आणि प्रोजेक्ट (इंटर्नल असेसमेंट) चे गुण अंतिम गुणांमध्ये जोडले जाणार आहेत.

ICSE (वर्ग 10) च्या दुसऱ्या सत्राच्या बोर्ड परीक्षा CISCE द्वारे 25 एप्रिल ते 20 मे 2022 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पहिल्या सत्राचा निकाल शाळांना पाठवण्यात आला आहे. बोर्ड, निकालानंतर, दहावीच्या टॉपर्सची यादी प्रसिद्ध केली जाईल.

असं बघा रिझल्ट

cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर ‘ICSE निकाल 2022’ या लिंकवरुन रिझल्ट डाऊनलोड करता येईल
लॉगिन क्रेडेंशियल्स, रोल नंबर आणि जन्मतारीख टाकल्यावर तुमचा रिझल्ट डिस्प्ले होईल.
रिझल्ट डिस्पले झाल्यावर विद्यार्थी  निकालाची डिजिटल मार्कशीट डाउनलोड करू शकतात आणि प्रिंटआउट घेऊ शकतात.