AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर बलुचिस्तान वेगळं झालं तर पाकिस्तान राहणार फक्त ‘एवढाच’, किती आहे क्षेत्रफळ?

तुम्ही कधी हा विचार केला आहे का? समजा बलुचिस्थान पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकिस्तानचं क्षेत्रफळ किती असेल त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

जर बलुचिस्तान वेगळं झालं तर पाकिस्तान राहणार फक्त 'एवढाच', किती आहे क्षेत्रफळ?
| Updated on: May 12, 2025 | 4:43 PM
Share

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले, दरम्यान या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावर प्रचंड वाढला आहे. भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यामध्ये पाक व्याप्त काश्मीरमधील पाच तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी अड्ड्यांचा समावेश होता, दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला.

पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतून लावला, प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे भारत पाकिस्तानवर हल्ला करत असताना दुसरीकडे बलुच आर्मीचे देखील पाकिस्तानवर हल्ले सुरूच आहेत, दोनच दिवसांपूर्वी बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्यांच्या तळावर हल्ला केला. बलुचिस्तानवर पाकिस्तानात अन्याय होत असून, वेगळा बुलचिस्तान निर्माण व्हावा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. आतापर्यंत बलुच आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावर 56 पेक्षा अधिक हल्ले करण्यात आले होते, तसेच त्यांनी पाकिस्तानची ट्रेन देखील हायजॅक केली होती.

दरम्यान तुम्ही कधी हा विचार केला आहे का? समजा बलुचिस्थान पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकिस्तानचं क्षेत्रफळ किती असेल त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. बलुचिस्तान हा सध्या पाकिस्तानचा एक भाग आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे राज्य आहे. पाकिस्तानच्या चार राज्यांपैकी हे सर्वात मोठं राज्य आहे. बलुचिस्तानचं क्षेत्रफळ 347,190 वर्ग किलोमीटर आहे. हे क्षत्रफळ पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी 43. 6 टक्के एवढं आहे. बलुचिस्तानच्या सरकारी वेबसाईटनुसार जर बलुचिस्तान पाकिस्तानमधून वेगळं झालं तर पाकिस्तानचं एकूण क्षेत्रफळ हे 43.6 टक्क्यांनी कमी होणार आहे. पाकिस्तानचं एकूण क्षेत्रफळ बलुचिस्तान धरून 881,913 वर्ग किमोमीटर आहे. बलुचिस्तानची सीमा ईरान आणि अफगानिस्तानला लागून आहे. त्यामुळे जर पाकिस्तानमधून बलुचिस्तान वेगळा झाला तर जवळपास पाकिस्तानचं अर्ध क्षेत्रफळ कमी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या बलुचिस्तानची मागणी होत आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक