AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच वर्षात भारतातले रस्ते युरोप-अमेरिकेसारखे होतील; नितीन गडकरींचं आश्वासन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkar) यांनी सांगितले की, पुढील 5 वर्षात भारतातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या होतील.

पाच वर्षात भारतातले रस्ते युरोप-अमेरिकेसारखे होतील; नितीन गडकरींचं आश्वासन
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 26, 2021 | 12:58 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkar) यांनी गुरुवारी सांगितले की, पुढील 5 वर्षात भारतातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला आहे, ज्यामध्ये आम्ही मागील 5 वर्षात 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. गडकरी म्हणाले की, देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. (In five years, Indian roads will be like Europe-America; Nitin Gadkari’s assurance)

टाईम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये गडकरी म्हणाले, मी तुम्हाला वचन देतो की येत्या 5 वर्षात भारतातील संपूर्ण पायाभूत सुविधा बदलतील आणि त्या अमेरिका आणि युरोपसारख्या होतील. ग्रीन एक्सप्रेसवे कॉरीडोरचं नेकवर्क पूर्णपणे सज्ज आहे. ज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि 30 किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश आहे.

या सर्व प्रकल्पांवर 10,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि हा अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना असेल, ज्यामुळे दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल. ते म्हणाले की, सीमेवरील रस्ते बांधण्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया टनेल मॉडेल पद्धतीने काम केले जात आहे जेथे तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं आहे.

गडकरी म्हणाले की, कैलास मानसरोवर प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे, यामुळे आगामी काळात कैलास मानसरोवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमी प्रवास करावा लागेल. त्याचबरोबर चार धाम प्रकल्पावरही काम सुरू आहे. म्हणजेच आता कोणत्याही मोसमात गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ प्रवास करता येईल. यावर एकूण 12000 कोटींचा खर्च होत आहे.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, त्यांचे लक्ष जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांवर आहे, जेथे दररोज 35 कि.मी. रस्ता तयार होत आहे आणि गेल्या 358 दिवसांपासून ते निरंतर सुरु आहे. जर आपण त्याच वेगाने पुढे जात राहिलो तर येत्या काळात दिवसाला 35 ऐवजी 40 किमी रस्त्यांचे बांधकाम होईल.

Green Highways वर सरकार 7 लाख कोटी खर्च करणार

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या (Green Express Highways) बांधकामावर सरकार सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, या Green Express Highways मुळे देशातील परिवहन अधिक स्मार्ट होईल. त्याचबरोबर प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने डिजिटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

दिल्ली-मुंबई कार प्रवास 12 तासांत

परिवहन मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन अंतर्गत 111 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे आणि हरित दृष्टीकोन स्वीकारून सरकार ‘पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. नितीन गडकरी म्हणाले की, 22 ग्रीन हायवे कॉरिडोरपैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन महानगरांदरम्यान कारने प्रवास करण्याचा वेळ कमी केला जाईल. हा प्रवास 12 तासांमध्ये होऊ शकेल, सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 40 तास लागतात.

60 टक्के काम पूर्ण

गडकरी म्हणाले की, या 1,300 कि.मी. प्रकल्पातील 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम एका वर्षात पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ते म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ लेन असतील. दुसर्‍या टप्प्यात त्यांची संख्या 12 होईल. त्याअंतर्गत स्वतंत्र इलेक्ट्रिक हायवे लेनही बांधली जाईल. ते म्हणाले की, एका वर्षात इलेक्ट्रिक ट्रकदेखील उपलब्ध होतील.

नितीन गडकरी म्हणाले की, दिल्ली-अमृतसर-कटरा प्रकल्पाचे काम दोन ते तीन महिन्यांत सुरू होईल. याशिवाय पाइपलाईनमधील 4,063 कोटी रुपयांचा दिल्ली-फरीदाबाद-सोहना एक्सप्रेस महामार्ग आणि अहमदाबाद-ढोलेरा महामार्ग प्रकल्प 4,000 कोटी रुपयांचा आहे, तोदेखील सादर करण्यात आला आहे.

इतर बातम्या

Green Highways वर सरकार 7 लाख कोटी खर्च करणार, नितीन गडकरींचं सॉलिड प्लॅनिंग

तुमची आवडती कार लवकर बुक करा, 1 एप्रिलपासून ‘या’ गाड्या महागणार

कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा

(In five years, Indian roads will be like Europe-America; Nitin Gadkari’s assurance)

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना