रेंजर पतीने हॉटेलात गर्लफ्रेंडला नेले, कॉन्स्टेबल पत्नीने टाकली धाड, पुढे काय झाले ?
सध्या एका रेंजर पतीने त्याच्या गर्लफ्रेंडला हॉटेलात नेऊन रुम बुक केल्यानंतर त्याच्या कॉन्स्टेबल पत्नीने हॉटेलात जाऊन तमाशा केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एका रेंजर असलेल्या पतीला त्याच्या पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पत्नीने एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत रेड हँण्ड पकडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या रेंजर असलेल्या पतीने आलिशान हॉटेलात रुम बुक केली होती. त्यानंतर त्या रेंजरने आपले आधारकार्ड काऊंटरवर जमा केले आणि स्वत:चे नाव देखील नोंदवले. परंतू त्याने सोबत असलेल्या गर्लफ्रेंडचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवले नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. या रेंजरची पोलिस कॉन्स्टेबल असलेली पत्नी ऐन वेळी आली आणि तिने पतीला रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला, परंतू झाले वेगळेच…
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील रेंजर बृजेंद्र पाण्डेय रविवार रात्री 10:48 वाजता रीवा येथील हॉटेल रॉयल इन येथे पोहचले. त्यांनी हॉटेलमध्ये रुम नंबर २०६ बुक केले होते. हॉटेल रेकॉर्डमध्ये रेंजरने स्वत:ची सर्व माहिती नोंदविली आहे. मात्र त्याची पत्नीला अचानक पतीच्या या भागनगडीची कुणकूण लागली.
बाथरूम लपली महिला
सोमवारी दुपारी रेंजरची पत्नीला पतीच्या हॉटेलमध्ये उतरण्याची गुप्त बातमी मिळाली. त्यानंतर त्याची पत्नी थेट हॉटेलमध्ये त्या रुम नंबर २०६ मध्ये पोहचली. त्यानंतर तिला रिसेप्शनकडे रजिस्टर चेक केले असता तिची माहिती खरी निघाली. त्यानंतर तिने रुममध्ये जाऊन दरवाजा जोरजोराने ठोठावला. त्यानंतर तिच्या पती सोबत असलेली महिला बाथरुममध्ये लपली. त्यानंतर रेंजर आणि त्याची कॉन्स्टेबल महिला यांच्या मोठा वाद आणि भांडण सुरु झाले.
हॉटेलात हंगामा
प्रत्यक्षदर्शींच्या मते वाद वाढत गेल्याने हॉटेलमध्ये अफरातफर माजली. यादरम्यान रेंजर बृजेंद्र पाण्डेय यांनी पत्नीला शांत करण्याचा आणि त्या गर्लफ्रेंडला तेथून सटकण्याचा मार्ग मिळण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. मात्र, त्यांच्या पत्नीने त्यांना एकामागोमाग प्रश्नांची सरबत्ती सुरुच ठेवली. त्यानंतर रेंजर आणि त्यांच्या सोबतची महिला हॉटेलच्या बाहेर पडले. त्यांनी तेथून एक ट्रक पकडून ते निघून गेले.
या प्रकरणात चोरहाटा पोलिस ठाण्यात रेंजरच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. पोलिस आता सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत असून या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रेंजर यांची पत्नी सतना जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.