
भारतात अनेक देवतांची मंदिरे आहेत. परंतू देशात एक असेही मंदिर आहे. जेथे देवतेची मूर्ती वा प्रतिमा नाही तर चक्क एका बुलेट बाईकची पूजा केली जाते. हे ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसला असेल, परंतू हे सत्य आहे. या मंदिराचे नाव ओम बन्ना मंदिर असून येथे चक्क एका बुलेट बाईकला अंगारे धुपारे लावून पूजले जाते. लोक श्रद्धेने या ‘बुलेट बाबा’ मंदिराचे दर्शन घेऊन धन्य होतात.
हे आगळे वेगळे बुलेट बाबाचे मंदिर राजस्थानातील पाली-जोधपूर हायवेच्या जवळ आहे. अशी मान्यता आहे की या मंदिरात जो कोणी पूजा करण्यासाठी पोहचतो त्याला रस्ते अपघातापासून मुक्ती मिळते. येथे केवळ बुलेट बाईकची पूजाच केली जात नाही तर त्याला मद्य, नारळ आणि फुलेही चढवली जातात.या मंदिराची कहानी मोठी रंजक आहे. चला तर पाहूयात काय आहे की कहाणी नेमकी ?
राजस्थानच्या ओम बन्ना मंदिराच्या पाठी एक बुलेट बाईकची प्रतिष्ठापना केलेली आहे. या बाईकचा नंबर RNJ 7773 आहे. या बुलेट बाईकवर लोक फुले, नारळ, मद्य आणि पैसे चढवतात. असे म्हटले जाते की या बुलेट बाईकला ओम बन्ना नावाचा व्यक्ती चालवायचा. त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ओम बन्न या बुलेट बाईकवर स्वार होते. रस्ते अपघातानंतर बुलेट बाईकला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. मात्र बाईक रोज त्याच स्थळी जायची, जेथे ओम बन्ना याचा मृत्यू झाला होता.
असे वारंवार होऊ लागले होते. पोलिसांना या बाईकला चेन आणि टाळा लावला. त्यातील पेट्रोल देखील काढले. तरीही रहस्यमयरित्या ही बाईक ओम बन्ना याच्या मृत्यूच्या ठिकाणी पोहचायची. त्यामुळे स्थानिकांनी त्या जागी ओम बन्ना मंदिर बांधले. त्यानंतर त्यांची बाईक कायम स्वरुपी तेथेच ठेवण्यात आली.
ओम बन्ना यांचा मृत्यू 2 डिसेंबर 1988 मध्ये झाला होता. अनेक वर्षे जुन्या मंदिराच्या विषयी लोकांची श्रद्धा आहे. राजस्थानातील काना कोपऱ्यातून लोक या मंदिरात पुजा करण्यासाठी येत असतात. असे म्हटले जाते की या मंदिरात येणाऱ्या भक्तांचे संरक्षण ओम बन्ना करतात.