एससी, एसटीवर अन्याय, लोकशाही संपवून मनुस्मृती…डिलिमिटेशन बिलामुळे देशावर संकट, INDIA आघाडीचा खळबळजनक दावा!

ज्या निवडणूक आयोगाने 10 कोटी लोकांना मतदार यातीतून बाहेर काढलं त्याच निवडणूक आयोगाकडे मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्हाला हे मान्य नाही, अशी भूमिका खरगे यांनी घेतली.

एससी, एसटीवर अन्याय, लोकशाही संपवून मनुस्मृती...डिलिमिटेशन बिलामुळे देशावर संकट, INDIA आघाडीचा खळबळजनक दावा!
india alliance and mallikarjun kharge
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 1:49 PM

संविधान संशोधन विधेयक हे लोकशाहीसाठी मोठं संकट आहे. लोकशाहीला संपवून संपूर्ण सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. आता 850 जागा वाढवून भाजपा कायमस्वरुपी सत्ता आपल्या हातात घेऊ इच्छीत आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एससी, एसटीच्या हिताचा विचार या विधेयकात करण्यात आलेला नाही. विधेयकात एसी, एसटीच्या जागाही वाढायला हव्यात. परंतु आताच्या विधेयकात तशी कोणतीही तरतूद नाही. 2026 सालाची जनगणना येणार आहे. ताज्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर एससी, एसटी प्रवर्गाला जास्त जागा मिळू शकतात. परंतु एससी, एसटीला त्यांचा वाटा मिळू नये यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केला जातोय. विधेयकाच्या तरतुदीतून हीच बाब दिसत आहे.

Loading...

ज्या निवडणूक आयोगाने 10 कोटी लोकांना मतदार यातीतून बाहेर काढलं त्याच निवडणूक आयोगाकडे मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्हाला हे मान्य नाही. ज्ञानेश कुमार हे तर आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात सगळं होत असेल तर मनमानी कारभार चालेल. निवडणूक आयोग मनमानी पद्धतीने काम करण्याची शक्यता आहे. राखीव जागा खुल्या प्रवर्गाला दिल्या जाऊ शकतात, असा मोठा आरोपही खरगे यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us