
भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या S-400, आकाशतीर या एअर डिफेंस सिस्टमची ताकद जगाला दाखवली. पाकिस्तानचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले या प्रणालीने अयशस्वी केले होते. आता भारत आणखी एक एअर डिफेंस सिस्टम बनवणार आहे. सरकार त्यासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्याच्या शेवटी या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. या मंजुरीस एओए (Acceptance of Necessity) म्हटले जाते. QR-SAM अत्यंत वेगाने काम करणारी स्वदेशी एअर डिफेंस सिस्टम आहे. यामुळे शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन २५ ते ३० किलोमीटर लांबीवरुन नष्ट करता येईल.
भारताच्या नवीन एअर डिफेन्स सिस्टमचे नाव क्विक रिएक्शन सरफेस-टू-एयर मिसाइल (QRSAM) आहे. ही पूर्णपणे स्वदेशी प्रणाली आहे. ही प्रणाली पश्चिमी आणि उत्तर सीमांवर तैनात करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे भारताची डिफेंस सिस्टम अधिक मजबूत होणार आहे. ही सिस्टम वेगाने काम करत शूत्रंचे ड्रोन आणि विमाने शोधून काढते. ट्रॅक करते. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करते. त्याची मारक क्षमता ३० किलोमीटरपर्यंत आहे. भारतीय सैन्याला लवकरच रडार मशीन, लहान टप्पाची क्षेपणास्त्र, लेझर सिस्टम मिळणार आहे. त्यामुळे तुर्की आणि चीनसारख्या देशांकडून येणाऱ्या ड्रोन हल्ल्यास प्रत्युत्तर देता येणार आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताकडे असणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टमने जोरदार कामगिरी बजावली. पाकिस्ताने पाठवलेली चीन, तुर्कीचे ड्रोन तसेच चीनची क्षेपणास्त्र नष्ट केली. डीआरडीओ मागील चार वर्षांपासून QR-SAM सिस्टमवर काम करत आहे. त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. वेगवेगळ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी त्याची चाचणी केली गेली. दिवसा आणि रात्रीसुद्धा त्याची चाचणी करण्यात आली. भारत इलेक्ट्रोनिक्स आणि भारत डिनामिक्स या सरकारी कंपन्यांनी मिळून QR-SAM सिस्टम तयार केली आहे.
QR-SAM सिस्टममुळे भारताची हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत होणार आहे. या प्रणालीमध्ये लांब पल्याचे Triumf’ क्षेपणास्त्र (380 किलोमीटर मारक क्षमता) आणि बराक-8 (Barak-8) मध्यम टप्प्याची सिस्टम (70 किलोमीटर) यांचाही समावेश केला आहे.