AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणसोबत युद्ध सुरू असतानाच भारताचा अमेरिकेला जबर धक्का; मोठा निर्णय घेणार?

अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे, अमेरिकेकडून इराणवर भीषण हल्ले सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, आता भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे.

मोठी बातमी! इराणसोबत युद्ध सुरू असतानाच भारताचा अमेरिकेला जबर धक्का; मोठा निर्णय घेणार?
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 01, 2026 | 5:36 PM
Share

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता हे युद्ध चांगलंच भडकण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे जगावर एक मोठं संकट आलं आहे, ते म्हणजे होर्मुज जलडमरूम सारखा कच्च्या तेलाची वाहतूक करणारा मार्ग आता इराण बंद करण्याची शक्यता आहे. या परिसरात इराणकडून एका तेलाच्या टँकरवर देखील हल्ला करण्यात आला, ज्या तेल टँकरवर हल्ला करण्यात आला त्या तेल टँकरवर 15 भारतीय क्रू होते, अशी माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान इराणकडून अद्याप हा मार्ग बंद करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, मात्र खबरदारी म्हणून अनेक तेल कंपन्यांनी या मार्गाची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका हा भविष्यात भारताला बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावला होता. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. अमेरिकेसोबत ट्रेड डील झाल्यानंतर भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी देखील कमी केली होती, मात्र आता अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धामुळे भारतामध्ये कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. सध्या भारताकडे 10 दिवस पुरेल इतका तेलाचा साठा असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान जर भारतामध्ये कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवला तर भारत पुन्हा एकदा रशियाकडून तेलाची आयात वाढवण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की, सध्या भारताकडे पर्याप्त तेलसाठा आहे, त्यामुळे जर होर्मुज जलडमरूम काही दिवस बंद राहिला तर त्याचा म्हणावा इतका परिणाम भारतावर होणार नाही, मात्र जर दिवस वाढले तर भारत पुन्हा एकदा रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढू शकतो, जर भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली तर हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...