वायुसेनेत अग्निवीरांची ‘या’ दिवसापासून भरती, असा करा अर्ज…

| Updated on: Oct 31, 2022 | 2:38 PM

अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची ही भरती जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे. 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वायुसेनेत अग्निवीरांची या दिवसापासून भरती, असा करा अर्ज...
Follow us on

नवी दिल्लीः भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची ही भरती जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे. 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार हवाई दलात भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. तर ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, अग्निवीरांसाठी ऑनलाईन परीक्षा 18 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे.

अग्निपथ योजनेअंतर्गत युवकांना हवाई दलात अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कमही दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान 30 दिवसांची रजाही दिली जाणार आहे. याशिवाय त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजाही दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पात्रता निकष काय आहे?

भरती होणाऱ्या उमेदवारांना बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण गरजेचे आहेत.

इंजिनीअरिंगमधून तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. त्यांना 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे.

फिजिक्स आणि गणितसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी असणार आहे.

अग्निवीरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उंची 152.5 सेमी असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…

हवाई दलात अर्ज करण्यासाठी agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होमपेजवर तुम्हाला Apply Online वर क्लिक करावे लागणार आहे.

उमेदवारांना प्रथम साइन इन करावे लागणार आहे.

साइन अप केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळणार आहे.

तुम्हाला लॉगिन-पासवर्डद्वारेच अर्ज भरावा लागणार आहे.

शेवटी अर्जाची फी भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.

उमेदवारांना सांगितले गेले आहे की, अर्जाची फी 250 रुपये आहे आणि ती डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकते.