
भारतास ७,५१६ किमी पेक्षा जास्त लांबीची किनारपट्टी असून हा एक भौगोलिक चमत्कार म्हटला जातो. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराने वेढलेल्या भारताच्या सीमांची सुरक्षा भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडे आहे.भारतीय नौदलाने अलिकडे पाकिस्तान सोबत झालेल्या तणावाच्या वेळी मोठी कामगिरी केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय नौदल आता ४४ हजार कोटीची समुद्री सुरुंग शोधून त्यास नष्ट करणारी यंत्रणा असलेली स्वदेशी माईन काऊंटर मेजर वेसल्स(MCMV) विकसित करणार आहे. त्यामुळे भारताच्या समुद्र सीमातर सुरक्षित होतीलच शिवाय अटीतटीच्या प्रसंगी नौदलाच्या युद्धनौकांचा मार्ग निर्धोक करण्याची जबाबदारी 12 MCMVवर असणार आहे.
समुद्री सुरुंग नष्ट करणाऱ्या 12 स्वदेशी माईन काऊंटर मेजर वेसल्स (MCMV) लवकरच नौदलाच्या ताफ्यात येणार आहेत. ४४, ००० कोटी रुपयांच्या खर्चातून या माईन काऊंटर वेसल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या वेसल्स आता समुद्रात शत्रूने पेरलेले सुरुंग शोधून त्यांना नष्ट करण्याचे काम या नौका बजावणार आहेत. या महत्वाकाक्षी योजनेला संरक्षण मंत्री मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील डिन्फेस एक्विजिशन काऊंसिलला (DAC) लवकरच मंजूरी देणार आहे.
MCMV म्हणजे Mine Counter Measure Vessel एक खास प्रकारची नौदलाची नौका आहे, जी समुद्राच्या खाली पेरलेले सुरुंग शोधून काढून त्यांना नष्ट देखील करते.
या नौका अंदाजे ६० मीटर लांबीच्या आहेत आणि १००० टनांपर्यंत वजनाची आहेत.
पारंपारिक युद्धनौकांपेक्षा त्या लहान दिसू शकतात, युद्धाच्या वेळी त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
या जहाजांमध्ये अँडव्हान्स सोनार, रोबोटिक उपकरणे आणि नॉन-मॅग्नेटिक मटेरियल वापरले जाते, जेणेकरून शत्रूचे सुरुंग या जहाजांना ट्रिगर करू शकणार नाहीत.
सध्या भारताकडे एकही MCMV नाही
भारतीय नौदलाकडे सध्या एकही माईन स्वीपर नाही. जुने माईन स्वीपर अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत.
अशा परिस्थितीत, हा प्रकल्प केवळ धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील आवश्यक बनला आहे.