AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय रेल्वे कात टाकतेय! आता तुम्ही ट्रेनही घेऊ शकता भाड्यानं, रेल्वे मंत्र्यांची भारत गौरवची घोषणा

सध्या जी रामायणा एक्स्प्रेस चालवली जातेय, ती भारत गौरव अंतर्गतच आहे. तसच गुरुकृपा एक्स्प्रेस, सफारी एक्स्प्रेस, साऊथ इंडिया दर्शन या ट्रेन्सही खासगी व्यक्ती किंवा संस्था चालवणार आहेत. 12 ज्योतिर्लिंग, वेगवेगळे अभयरण्या दरम्याणही ह्या गाड्या चालवता येतील.

भारतीय रेल्वे कात टाकतेय! आता तुम्ही ट्रेनही घेऊ शकता भाड्यानं, रेल्वे मंत्र्यांची भारत गौरवची घोषणा
आता खासगी व्यक्ती किंवा संस्थांना ट्रेन बूक करायला मंजुरी दिली गेली आहे.
| Edited By: sagar joshi | Updated on: Nov 24, 2021 | 10:01 AM
Share

एक काळ होता, लग्नासाठी लोक गावाकडे बैलगाडी करुन जायचे. काळ बदलला, ट्रक, ट्रॅक्टर आले. नंतर हेही बदललं. ज्यांच्याकडे थोडा पैसा आला त्यांनी एस.टी. बस तसच ट्रॅव्हल्स बांधायला सुरुवात केली. आता तर काही जण असेही आहेत जे लग्नासाठी, पर्यटनासाठी हेलिकॉप्टर बुक करतात. पण आता एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला पर्यटनासाठी थेट रेल्वेच बूक करायची असेल तर ते करता येणार आहे. म्हणजे ‘थीम बेस’ रेल्वे चालवायला रेल्वे मंत्र्यांनी (Indian Railway) मंजुरी दिलीय. रेल्वे मंत्रालयानं ‘भारत गौरव’ (Bharat Gaurav) नावाच्या योजनेची घोषणा केलीय. याच योजने विशेषत: पर्यटनासाठी (Indian Tourism) अशा गाड्या चालवायला मंजुरी दिली गेलीय. विशेष म्हणजे कोणत्या रुटवर गाडी चालवायची, त्याचं भाडं काय असावं हे सर्व ठरवण्याचा अधिकार ऑपरेटरकडे असणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ह्या निर्णयानं पर्यटन क्षेत्रासाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसच पर्यटन करणाऱ्यांसाठी, त्याचं आयोजन, नियोजन करणाऱ्यांसाठीही अनेक सोई सुविधा उपलब्ध होणार आहेत.

रेल्वे बूक करण्याची प्रक्रिया काय असेल? पर्यटनासाठी किंवा एखादी थीम घेऊन रेल्वे बूक करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन नोंद करावी लागेल. त्यासाठी वन टाईम फी असेल 1 लाख रुपये. तुम्ही कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 10 वर्षासाठी रेल्वे भाड्यानं घेऊ शकता. सेक्युरिटी डिपॉजिट म्हणून प्रत्येक रेकसाठी 1 कोटी रुपये भरावे लागतील. एकदा रेल्वे बूक केली की, पर्यटनाला गेल्यानंतर तिथं प्रवाशांसाठीही ऑपरेटरला काही सुखसुविधा द्याव्या लागतील. त्यात मग रहाण्यासाठी हॉटेलची व्यवस्था, साईटसिईंग, खाण्यापिण्याची सोय, स्थानिक प्रवासाची सोयही करावी लागेल. ठिकठिकाणी प्रवाशांचं मनोरंजनाच्या सुविधाही उपलब्ध कराव्या लागतील. सध्यस्थितीत सामान्य व्यक्ती अशी ट्रेन किती बूक करतील याबाबत साशंकताच आहे पण मेकमाय ट्रीपसारख्या कंपन्या हे करु शकतील असं जाणकारांचं म्हणनं आहे. विशेष म्हणजे रेल्वेचे डब्बे, आतून बाहेरुन मॉडीफाय करण्याचीही भाड्यानं घेणाऱ्यांना परवानगी असेल.

सध्या अशा ट्रेन आहेत? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘भारत गौरव’ ची घोषणा करताना सांगितलं की, सध्या जवळपास दीडशे ट्रेन्स ह्या अशा भाड्यावर दिल्या जाणार आहेत म्हणजेच तीन हजारापेक्षा जास्त कोचेस असतील. एका ट्रेनला 14 ते 20 कोचेस जोडले जातील. सध्या जी रामायणा एक्स्प्रेस चालवली जातेय, ती भारत गौरव अंतर्गतच आहे. तसच गुरुकृपा एक्स्प्रेस, सफारी एक्स्प्रेस, साऊथ इंडिया दर्शन या ट्रेन्सही खासगी व्यक्ती किंवा संस्था चालवणार आहेत. 12 ज्योतिर्लिंग, वेगवेगळे अभयरण्या दरम्याणही ह्या गाड्या चालवता येतील.

हे सुद्धा वाचा:

UPSC Mains 2021 : यूपीएससीकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर, upsc.gov.in वर DAF जारी

Paneer Bread Pakora : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या-घरी तयार करा खास पनीर ब्रेड पकोडे, पाहा रेसिपी!

नियंत्रण सुटल्याने टेम्पो घुसला दुकानात; चार ते पाच दुकानांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ