नियंत्रण सुटल्याने टेम्पो घुसला दुकानात; चार ते पाच दुकानांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

चंद्रपूरच्या भद्रावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने  भरधाव चारचाकी दुकानात घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये चार ते पाच दुकानांचे नुकसान झाले आहे.

नियंत्रण सुटल्याने टेम्पो घुसला दुकानात; चार ते पाच दुकानांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली


चंद्रपूर : चंद्रपूरच्या भद्रावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने  भरधाव वाहन दुकानात घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये चार ते पाच दुकानांचे नुकसान झाले आहे. वरोरा वरून चंद्रपूरकडे जात असताना भद्रावतीमध्ये आल्यानंतर चालकाचे टाटा एस या वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुकानांमध्ये शिरली. हा अपघात भद्रावती बसस्थानक परिसरात घडला आहे.

दारूच्या नशेत अपघात

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित टेम्पो हा वरोरावरून चंद्रपूरकडे जात होता. भद्रावतीमध्ये आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला. या घटनेतील चालक हा दारूच्या नशेत होता, दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला अंदाज आला नाही आणि गाडी दुकानात घुसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणात चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्यचाे पोलिसांनी म्हटले आहे.

…तर झाला असता अनर्थ

या अपघातामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नाही, मात्र चार ते पाच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाडीचे देखील नुकसान झाले. चालक हा नशेत असल्याने वाहनावरील ताबा सुटून ही घटना घडली. दरम्यान हा अपघात भद्रावती बसस्थानक परिसरात घडला आहे. या भागात कायमच वर्दळ असते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. तसेच संबंधित चालकावर कडक कारवाई करवी अशी मागणी देखील काही नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट…’ शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याने धरला ठेका; गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष

एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर, उद्या पुन्हा बैठक; अनिल परब यांची माहिती

Aurangabad: जायकवाडीत दुर्मिळ ‘युरेशियन कर्ल्यू’चं आगमन, जगात फक्त 7 हजार पक्षी शिल्लक

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI