Aurangabad: जायकवाडीत दुर्मिळ ‘युरेशियन कर्ल्यू’चं आगमन, जगात फक्त 7 हजार पक्षी शिल्लक

युरोपियन देशात मोठ्या प्रमाणावर थंडी आणि बर्फवृष्टी सुरु असल्याने हिवाळ्यात तेथील पक्षी भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात स्थलांतरीत करतात. याच प्रक्रियेत जायकवाडी धरणाच्या जलाशयावर आता विविध युरोपियन पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

Aurangabad: जायकवाडीत दुर्मिळ 'युरेशियन कर्ल्यू'चं आगमन, जगात फक्त 7 हजार पक्षी शिल्लक
जायकवाडीत दुर्मिळ युरेशियन कर्ल्यू पक्ष्याचे दर्शन
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 7:38 PM

औरंगाबादः हिवाळ्यात उत्तरेकडील तसेच युरोपीय देशांमध्ये थंडी आणि बर्फवृष्टी सुरु झाल्याने तेथील तलाव, पाणथळ गोठू लागतात. त्या पक्ष्यांना खाद्य मिळत नसल्याने ते भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशांकडे स्थलांतरीत होता. त्यामुळे सध्या जायकवाडी धरणावर (Jayakwadi Dam) सध्या स्थलांतरीत पक्षांचे आगमन सुरु झाले असून यंदा 8 वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच ‘युरेशियन कर्ल्यू’ या पक्षाचे आगमन झाले आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या अहवालाप्रमाणे हा पक्षी धोकाप्रवण श्रेणीत मोडतो. जगभरात केवळ 7 हजार युरेशियन कर्ल्यू शिल्लक आहेत. त्यामुळे या पक्षाचे आगमन जायकवाडी जलाशयावर होणे हे निसर्ग व पक्षीप्रेमींसाठी सुखावह आहे.

जायकवाडीवर हिवाळी पाहुण्यांचे आगमन

सध्या युरोपीयन देशात थंडीची लाट सुरु असल्याने तेथील पाणथळी गोठतात. त्यामुळे या पक्ष्यांना पुरेशा प्रमाणात खाद्य मिळत नाही. मात्र भारतात उष्ण वातावरण असल्याने येथील पाणवठे गोठत नाहीत. जायकवाडी धरण परिसरातील पाणथळांमध्ये या पक्ष्यांना खाद्य मिळते. येथील पाणथळांमधील पाणी खोल खोल जात असल्याने पक्ष्यांना किडे, लहान मासे खाद्य म्हणून सहजपणे मिळतात. त्यामुळेच येथे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणावर परदेशी पाहुण्यांचे आगमन होते.

8 हजार किमी अंतर पार करून आला युरेशियन कर्ल्यू

औरंगाबादचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरेशियन कर्ल्यू हा स्कॉटलंड तसेच युपोपीय देशातील पक्षी असून तो 7 ते 8 हजार किलोमीटरचे अंतर पार करून भारतात येत असतो. मागील आठवड्यातच तो जायकवाडीत दाखल झाला असावा. लांब टोकदार चोच, 400 ते 800 ग्राम वजन अशी या पक्षाची वैशिष्ट्ये आहेत. या पक्ष्याचा रंग वाळूसारखा असल्याने तो लवकर लक्षात येत नाही. तर या पक्षाचे पाय हिरवट निळ्या रंगाचे असतात. हिवाळा संपल्यानंतर प्रजननासाठी तो परत युरोपात जातो.

इतर बातम्या-

कृषी कायदा मागे घेण्याबाबत पंतप्रधान मोदींची बुधवारी महत्त्वाची बैठक, क्रिप्टोकरन्सीबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्याता

कोण होणार रिलायन्सचा उत्तराधिकारी? मुकेश अंबानी बनवतायत महत्त्वाचा प्लॅन : रिपोर्ट

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.