AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चीनचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जगभरात मोठी खळबळ, आता युद्ध भडकणार, थेट..

अमेरिका आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं, त्यानंतर आता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, मात्र त्यानंतर एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! चीनचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जगभरात मोठी खळबळ, आता युद्ध भडकणार, थेट..
Donald Trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 5:10 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. इराणकडून अमेरिकेच्या आखाती देशात असलेल्या सैन्य तळांना लक्ष्य करण्यात आलं. इराण सैन्य तळांवर एवढे अचूक हल्ले कसे करत आहे, असा प्रश्न अमेरिकेला पडला होता. यावरून अमेरिकेने सुरुवातीला रशियावर आरोप केले होते, रशियन सॅटेलाइटने पुरवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे इराण अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले करत आहे, असा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता. रशियाकडून अमेरिकेचे हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते, मात्र आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

इराणने रशियाच्या नाही तर चीनच्या गुप्तचर सॅलेलाईटच्या मदतीने अमेरिकेच्या सैन्य तळांवर युद्धकाळात हल्ले केल्याची माहिती आता समोर आली आहे. फायन्शियल टाइम्सच्या वतीनं हा दावा करण्यात आला आहे. एफटीच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, इराणने अमेरिकेच्या आखाती देशातील सैन्य तळांना लक्ष्य करण्यासाठी चीनच्या सॅटेलाइटची मदत घेतली होती. 2024 मध्ये अतिशिय गोपनिय पद्धतीने चीन आणि इराणध्ये ही डील झाल्याचा दावा देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

रानी सेनेच्या लीक झालेल्या कागदपत्रांच्या हवाल्याने एफटीकडून हा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की,TEE-01B सॅटेलाइट ज्याची निर्मिती चीनची कंपनी असलेल्या Earth Eye Co ने केली होती. त्यानंतर ही सिस्टम इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने खरेदी केली, हा सैदा अतिशय गोपनिय पद्धतीने करण्यात आला, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एफटीच्या रिपोर्टमध्ये पुढे असंही म्हटलं आहे की, इराणला ठरलेल्या करारानुसार Emposat कडून अमेरिकनं सैन्य तळाची माहिती देण्यात आली, ही कंपनी बिजिंगमध्ये असून, ती सॅटेलाइट कट्रोल डेटा पुरवण्याचं काम करते, दरम्यान यावर अद्यापही अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजून आलेली नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...