AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा युद्धात मोठा विजय, अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, युद्धभूमीतून मोठी बातमी

इराण इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं असून, युद्धभूमीतून मोठी बातमी समोर आली आहे.

इराणचा युद्धात मोठा विजय, अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, युद्धभूमीतून मोठी बातमी
Iran, Israel WarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 9:16 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणमधील अनेक एअरबेस उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र दुसरीकडे अजूनही इराणने या युद्धातून माघार घेतलेली नाहीये.इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इराणने अमरिकेचं आणखी एक फायटर जेट पाडलं आहे. इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या सैन्यांनी अमेरिकेचं सर्वात आधुनिक F-15 ईगल लढावू विमान पाडलं आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डकडून या विमानाला लक्ष्य करण्यात आलं. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान अमेरिकेनं देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमचा पायलट देखील गायब असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

एवढंच नाही तर इराणने अमेरिकेचं फायटर जेट तर पाडलच आहे, परंतु अमेरिकेच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला देखील इराणकडून लक्ष्य बनवण्यात आलं आहे. इराणने अमेरिकेचं हे हेलिकॉप्टर देखील पाडलं आहे. पायलटला वाचवण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलं होतं, ते हेलिकॉप्टर देखील इराणने पाडलं आहे. अमेरिकेनं रेस्क्यू साठी एक C-130 विमान आणि चार हेलिकॉप्टर पाठवले होते, या हेलिकॉप्टरवर इराणकडून हाल्ला करण्यात आला आहे, समोर आलेल्या माहितीनुसार यातील एक हेलिकॉप्टर इराणने पाडलं आहे.

तस्नीम न्यूजच्या एका रिपोर्टनुसार इराणने अमेरिकेचं फायटर जेट F-15 ईगल पाडलं, त्यानंतर पायलटनं इंजेक्ट केलं तो खाली उतरला. मात्र अजूनही पायलटचा शोध लागलेला नाही, पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. तर काही न्यूज रिपोर्टनुसार विमानाचा भीषण स्फोट झाला, या स्फोटामध्ये पायलटचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान यापूर्वी इराणने अमेरिकेचं F-35 फायटर जेट देखील पाडलं होतं.हा अमेरिकेसाठी इराणचा मोठा धक्का मानला जात आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर 15 दिवसांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाचा देखील प्रयत्न झाला, मात्र अजूनही युद्ध विराम होऊ शकलेला नाहीये.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?