इन्कम टॅक्स विभागाच्या सिंघमची कमाल, कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी 15 दिवसांमध्ये 2 कोटी रुपये उभारले

| Updated on: May 13, 2021 | 11:27 AM

आयआरएस अधिकारी विक्रम पगारिया (IRS Vikram Pagaria) यांनी कोरोना संकटात लोकांच्या मदतीकरता पुढाकार घेतला आहे. IRS Vikram Pagaria

इन्कम टॅक्स विभागाच्या सिंघमची कमाल, कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी 15 दिवसांमध्ये 2 कोटी रुपये उभारले
Vikram Pagaria
Follow us on

जयपूर: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयांना रेमडेसिव्हीर औषधे, ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. प्राप्तिकर विभागातील सिंघम म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वरिष्ट आयआरएस अधिकारी विक्रम पगारिया (IRS Vikram Pagaria) यांनी कोरोना संकटात लोकांच्या मदतीकरता पुढाकार घेतला आहे.गुगल ड्राईव्ह मोहिमेद्वारे त्यांनी 15 दिवसांमध्ये 2 कोटी रुपये जमा केले आहेत. याद्वारे त्यांनी 30 शहरातील 42 रुग्णालयांमध्ये 400 उपकरण उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये ऑक्सिजन कंन्सट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर, औषधे आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे. विक्रम पगारिया यांच्या मोहिमेला भारतातील सर्व राज्ये आणि परदेशातून देखील मदत मिळाली आहे. (IRS Officer Vikram Pagaria started Help Indian Hospital Movement and collected 2 crore rupees)

प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. विक्रम पगारिया यांनी सुरु केलेल्या मोहिमेला त्यांच्या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं देखील सहकार्य मिळालेलं आहे. या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर विक्रम पगारिया यांनी दोन कोटी रुपये जमवले आणि देशभरातील 30 रुग्णालयांना आवश्यक उपकरण दिली आहेत.

हेल्प इंडियन हॉस्पिटल मोहीम

हेल्प इंडियन हॉस्पिटल या नावानं विक्रम पगारिया यांनी मोहीम सुरु केली. ऑनलाईन हेल्प ड्राईव्हद्वारे त्यांनी मदत कार्य सुरु केले. विक्रम पगारिया यांना यूनिवर्सल हेल्थ फाऊंडेशन, भूमिका ट्रस्टचं सहकार्य मिळाले. जमलेल्या दोन कोटीद्वारे त्यांनी ऑक्सिजन कंन्सट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर उपकरणं त्यांनी रुग्णालयांना दिली आहेत. या मोहिमेमध्ये देशातील विविध राज्यातील सनदी अधिकारी देखील मदत करत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड यासह इतर राज्यांमध्ये मदत पोहोचवलेली आहे.

24 तासांमध्ये आढळले 3 लाख 62 हजार रुग्ण

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 62 हजार 727 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 120 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे

संबंधित बातम्या:

कोविड न्यूमोनियाग्रस्त आईला वाचवण्यासाठी लेकीची धडपड, सोशल मीडिया,क्राऊडफंडिंगद्वारे 14 लाख उभारले

Maharashtra Fights Corona: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम कशी द्यायची? वाचा सोप्या टिप्स

(IRS Officer Vikram Pagaria started Help Indian Hospital Movement and collected 2 crore rupees)