AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel attacks on Iran : इस्रायलचा इराणवर हल्ला; इकडे आता भारत मोठ्या संकटात, टेन्शन वाढलं

अखेर इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने मिळून संयुक्तरित्या इराणवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे आता भारत देखील मोठ्या संकटात सापडला आहे.

Israel attacks on Iran : इस्रायलचा इराणवर हल्ला; इकडे आता भारत मोठ्या संकटात, टेन्शन वाढलं
Iran Israel War Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 3:00 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या हल्ल्याची तयारी सुरू होती. अमेरिकेनं आधीच मध्य पूर्वेत आपलं सैन्यबळ वाढवलं होतं. जगातील सर्वात शक्तिशाली दोन युद्ध नौका मध्य पूर्वेत तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. इराणच्या राजधानीवर अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. शांत इराणची निर्मिती करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तर या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना सर्व उद्ध्वस्त करून टाकू असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान युद्ध सुरू होताच इस्रायलमध्ये देखील आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर आता चवताळलेल्या इराणने देखील अमेरिकेच्या काही सैन्य ठिकाणांवर हल्ला केला आहे.  बहरीनमधल्या अमेरिकन नौदलाच्या तळावर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रचंड तणावाचं वातावरण असून, इराणमध्ये अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय दुतावासाने इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली आहे, घराच्या बाहेर पडू नका, बातम्यांवर लक्ष ठेवा आणि पुढील सूचना मिळण्याची वाट पहा असं भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. तसेच भारतीय दुतावासाकडून भारतीय नागरिकांसाठी हेल्प लाईक क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.

भारतावर मोठं संकट

दरम्यान जर युद्धाची परिस्थिती अशीच राहिल्यास भारतासह संपूर्ण जग मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.  जगभरात पेट्रोल, डिझेल हे प्रचंड महाग होण्याची शक्यता असून, याचा मोठा फटका हा भारताला बसणार आहे. कारण भारत कच्च्या तेलासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढल्यास इंधन सप्लायची साखळी खंडीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर इराणने स्ट्रेट ऑफ हॉरमुज बंद केला तर भारतावर मोठं इंधन संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रचंड महाग होण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...