AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : रशिया इराणच्या बाजुने मैदानात, होणार मोठा खेळ, पुतिन यांची अमेरिका, इस्त्रायलकडे थेट मोठी मागणी

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू सुरू आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. आता मोठी बातमी समोर आली असून, यामुळे इस्त्रायल आणि अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे.

Iran Israel War : रशिया इराणच्या बाजुने मैदानात, होणार मोठा खेळ, पुतिन यांची अमेरिका, इस्त्रायलकडे थेट मोठी मागणी
Russia AmericaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 6:37 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. आज युद्धाचा सहावा दिवस आहे. मात्र या युद्धामध्ये इराण एकटं पडल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्त्रायलला अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी भारतामधून इराणकडे निघालेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केला, या हल्ल्यामध्ये 87 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या घटनेला  24 तास उलटत नाहीत तोच इराणने या हल्ल्याचा बदला घेलता आहे, इराणने अमेरिकेच्या जहाजावर मिसाईल हल्ला केला. मिसाईल हल्ल्यानंतर अमेरिकेच्या जहाजाला आग लागल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. मात्र या घटनेवर अमेरिकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.  दरम्यान चीन आणि रशिया हे इराणचे मित्र देश आहेत. या दोन्ही देशांनी जरी युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी देखील त्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर सुरू असलेल्या या हल्ल्यांचा निषेध केला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे रशियाने इराणला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भारतामधील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी याबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. आम्ही इराण आणि तेथील नागरिकांसोबत संपूर्ण निष्ठेनं उभे आहोत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची देखील हीच भूमिका असून, त्यांनी इराण प्रती आपली संवेदना व्यक्त केली आहे. इस्त्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. आम्ही दोन्ही देशांकडे अशी मागणी करतो की, त्यांनी लवकरात लवकर हे हल्ले थांबून चर्चेच्या टेबलावर वापस यावं या प्रकरणावर शांततेच्या मार्गाने तोडगा निघावा, अशी आमची इच्छा असल्याचं रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच