Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, शोपियांमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा

| Updated on: Apr 09, 2021 | 5:37 PM

चकमकीत दहशतवादी संघटना अंसार गजवातुल हिंदचा प्रमुख इम्तियाज अहमद शाह याच्यासह 5 दहशतवादी ठार झाले आहेत.

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, शोपियांमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत 5 दहशतवादांच्या खात्मा करण्यात आलाय. या चकमकीत दहशतवादी संघटना अंसार गजवातुल हिंदचा प्रमुख इम्तियाज अहमद शाह याच्यासह 5 दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीरचे IGP विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही दहशतवादी मारले गेले आहेत. हे स्थानिक दहशतवादी होते. मृतांमधील 2 दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन, एक लष्कर-ए-तोयबा तर 2 दहशतवादी हे AGuH या दहशतवादी संघटनेचे होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा पार पाडली जाईल, असं IGP विजयकुमार यांनी सांगितलं. (Security forces kill 5 terrorists in Shopian district)

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बाबा मोहल्ला परिसरात दहशतवाद अशल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर परिसराला घेराव घालण्यात आला आणि नाकाबंदी करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरु केला. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले आहेत.

2 दहशतवादी मशिदीत लपले

गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर शोपियांमधील मशिदीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रय़त्न सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लपलेल्या दहशतवाद्याचा भाऊ आणि स्थानिक इमाम साहेप यांना दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यासाठी मशिदीत पाठवण्यात आलं. मशिदीचं नुकसान टालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी सांगितलं की पुलवामाच्या त्राल मध्ये शुक्रवारी सकाळी एका चकमकीत दोन अज्ञात दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलं.

यापूर्वी शोपिंया जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी एका सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला होता. मात्र, त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दहशतवाद्यांनी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांच्या आसपास शोपिया शहरातील इमामसाहिबमध्ये पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबारी केला होता. गोळीबारानंतर त्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्याचा फायदा घेत हे दहशतवादी फरार झाले होते.

इतर बातम्या :

Chhattisgarh Naxal attack : ना अट, ना शर्त, नक्षलवाद्यांनी जवानाला सुरक्षित सोडलं!

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीची पुरातत्व खात्याकडून तपासणी होणार, काशी विश्वनाथ मंदिराच्या याचिकेवर निकाल

Security forces kill 5 terrorists in Shopian district