AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhattisgarh Naxal attack : ना अट, ना शर्त, नक्षलवाद्यांनी जवानाला सुरक्षित सोडलं!

कोबरा कमांडो राकेश्वर सिंह मन्हास (Cobra Commando Rakeshwar Singh Manhas) या जवानाला नक्षलवाद्यांनी (Naxal) अखेर सुरक्षित सोडलं आहे.

Chhattisgarh Naxal attack : ना अट, ना शर्त, नक्षलवाद्यांनी जवानाला सुरक्षित सोडलं!
Cobra Commando Rakeshwar Singh Manhas
| Edited By: | Updated on: Apr 08, 2021 | 10:11 PM
Share

रायपूर : कोबरा कमांडो राकेश्वर सिंह मन्हास (Cobra Commando Rakeshwar Singh Manhas) या जवानाला नक्षलवाद्यांनी (Naxal) अखेर सुरक्षित सोडलं आहे. तुफान चकमकीत 22 जवान शहीद झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी एका जवानाला पकडून ठेवलं होतं. अखेर या जवानाला सुरक्षितरित्या सोडण्यात आलं. 3 एप्रिलला बिजापूर (Bijapur) इथं चकमक झाली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांचं अपहरण केलं होतं. मात्र शेकडो गावकऱ्यांसमोर नक्षलवाद्यांनी जवानाची सुटका केली. (CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas released by naxal brought to CRPF camp Chhattisgarh naxal attack )

पद्मश्री धर्मपाल सैनी (Padmashree Dharampal Saini) यांच्या उपस्थितीत कोणत्याही विनाअटीशिवाय नक्षलवाद्यांनी जवानाला कोणतीही दुखापत न करता सोडून दिलं. तिथून रवाना झाल्यानंतर जवान राकेश्वर CRPF कॅम्पमध्ये दाखल झाले.

राकेश्वर सिंह मन्हास हे तब्बल 6 दिवस नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते. त्यांच्या सुटकेसाठी सरकारकडून दोन सदस्यीय समिती स्थापन केली होती. यामध्ये पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत जवानाला सोडण्यात आलं.

11 सदस्यांची टीम बस्तरमध्ये

जवानाच्या सुटकेसाठी दोन सदस्यीय टीमसह 7 पत्रकारांची टीमही उपस्थित होती. मध्यस्थीसाठी 11 जणांचं पथक बस्तरमधील बीहड इथे गेलं होतं. नक्षलावाद्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर जवानाची सुटका करण्यात आली.

नक्षलवाद्यांनी घात केला

CRPF ला नक्षलवाद्यांचे दोन टॉप कमांडर मादवी हिडमा आणि सुजाता हे दबा धरुन बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र असं काहीच नव्हतं, नक्षलवाद्यांनी जवानांना मारण्यासाठी टाकलेलं हे जाळं होतं.

सीआरपीएफला गुप्त माहिती मिळाल्यानंतर, तब्बल 2000 जवानांना सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आलं. या तुकड्या मोहिमेवर पाठवण्यात आल्या. यामध्ये कोबरा युनिटचाही समावेश होता.

या जवानांना बस्तरिया बटालियन आणि राखीव तुकड्यांच्या युनिटवरुन पाठवण्यात आलं. जिथे नक्षली कमांडर असल्याची माहिती मिळाली, तिथे एक टीम दाखल झाली. मात्र त्याचवेळी घात झाला. जवपास 400 नक्षलवाद्यांनी जवानांना तिन्ही बाजूने घेरलं होतं. जवानांनी संख्या कमी आणि नक्षवादी मोठ्या संख्येने असलेल्या त्या ठिकाणी प्रचंड मोठी चकमक झाली. सीआरपीएफचे जवान नेटाने लढले. पण तब्बल 22 जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्याव लागली.

अधिकाऱ्यांच्या मते, नक्षलवाद्यांनी ठरलेल्या रणनीतीप्रमाणे हल्ला चढवला. जवानांना U आकारात घेरण्याची व्यूहरचना नक्षलवाद्यांनी आखली होती, त्यामध्ये ते यशस्वी ठरले.

संबंधित बातम्या 

नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’; ‘हे’ 8 नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या रडारवर

Chhattisgarh Maoist attack: बिजापूरच्या चकमकीत 22 भारतीय जवान शहीद; सापळा रचणारा नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा कोण आहे? 

Chhattisgarh Maoist Attack: नक्षलवाद्यांनी कसा हल्ला केला, भारतीय सुरक्षादलांची चूक कुठे झाली, वाचा इनसाईड स्टोरी

Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक, शहीदांचा आकडा 22 वर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.