AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhattisgarh Maoist Attack: नक्षलवाद्यांनी कसा हल्ला केला, भारतीय सुरक्षादलांची चूक कुठे झाली, वाचा इनसाईड स्टोरी

दंडकारण्यातील या भागात नक्षलवाद्यांची PLGA बटालियन 1 ही कार्यरत आहे. ही बटालियन अत्यंत सामर्थ्यशाली असल्याचे सांगितले जाते. | Chhattisgarh Maoist Attack

Chhattisgarh Maoist Attack: नक्षलवाद्यांनी कसा हल्ला केला, भारतीय सुरक्षादलांची चूक कुठे झाली, वाचा इनसाईड स्टोरी
| Updated on: Apr 05, 2021 | 7:34 AM
Share

नवी दिल्ली: छत्तीसगढमधील बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी (Naxal Attack) आणि भारतीय जवानांची चकमक झाली. यात 15 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवांना यश आलं असली तरी या चकमकीत 22 जवान शहीद झाले. हा भारतीय सुरक्षादलांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (22 jawans killed following deadly encounter between Naxals and security forces in Chhattisgarh Sukma)

दंडकारण्यातील या भागात नक्षलवाद्यांची PLGA बटालियन 1 ही कार्यरत आहे. ही बटालियन अत्यंत सामर्थ्यशाली असल्याचे सांगितले जाते. बिजापूर आणि आसपासच्या परिसरात त्यांची प्रचंड दहशत आहे. हा प्रभाव मोडून काढण्यासाठीच डीआरजी, एसटीएफ कोबरा आणि सीआरपीएफ यांच्याकडून ऑपरेशन प्रहार ही मोहीम राबवली जात होती.

3 एप्रिलला सुरक्षादलांना बीजापुर-सुकमा सीमारेषेवर असणाऱ्या तर्रेम डोंगराळ भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सुरक्षादलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या. 3 एप्रिलला दुपारी 12 वाजता जोनागुंडम आणि टिकलागुंडम या परिसरातील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षादलांचे जवान आमनेसामने आले.

भारतीय सुरक्षादलांची चूक नेमकी कुठे झाली?

नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा आणि त्याचे साथीदार बिजापूरच्या जंगलात डेरा टाकून बसल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. हे नक्षलवादी घात लावून हल्ला करु शकतात, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला होता.

कमांडर हिडमाच्या नेतृत्वाखाली या भागात 150 ते 160 नक्षलवादी छावण्या होत्या. हे नक्षलवादी कधीही सुरक्षादलांवर हल्ला करु शकतात, अशी माहिती होती. तरीदेखील ऐन वेळेला भारतीय जवानांचा घात झाला.

नेमकं काय घडलं?

2 एप्रिल रोजी CoBRA, CRPF, STF और DRG ने एक संयुक्त ऑपरेशन हाती घेतलं.

>> तर्रेम, उसूर, पामेड आणि मनिपा (सुकमा) आणि नरसापूरम (सुकमा) येथून सुरक्षा दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले.

>> सुरक्षा दलाला माओवादी एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली. त्याच आधारे हे ऑपरेशन हाती घेण्यात आले.

>> 3 एप्रिल रोजी दुपारी सुकमा-बीजापूर बॉर्डवर जोनागुडा गावाजवळ माओवाद्यांनी अचानक हल्ला केला.

>> ही चकमक जिथे झाली तिथून सुरक्षा दलाचे तर्रेम शिबीर अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

>> नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून हा हल्ला केला होता. 2010मध्ये ताडमेतला येथे आणि 2020मध्ये मिनपा येथे झालेल्या हल्ल्यासारखाच हा हल्ला होता.

>> हा ठरवून घेतलेला निर्णय होता. आम्ही माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात होतो. आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो. ही मोठी लढाई होती, ती निकराने लढल्या गेली, असं या अभियानाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं.

>> माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-1चं नेतृत्व कमांडर हिडमा करत होता. याच बटालियनने जवानांवर हल्ला केला. त्यात एकूण 180 नक्षलवादी होते. पामेड एरिया कमिटीचे नक्षलवादी पलटन, कोंटा एरिया कमिटी, जगरगुंडा आणि बासागुडा एरिया कमिटीचीही त्यांना साथ मिळाली होती. त्यामुळे या नक्षलवाद्यांची एकूण संख्या 250 झाली आहे.

>> सुरक्षा दलाचे जवान मात्र दोन किलोमीटरच्या परिसरात घेरले गेले होते. तसेच सर्व जवान एकत्र नव्हते. ही चकमक सुमारे 5 ते 6 तास चालली. म्हणजे शनिवारी 4 वाजल्यापर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली.

>> या हल्ल्यात 9 नक्षलवादी मारले गेले आणि 12 नक्षलवादी जखमी झाल्याचा सुरक्षा दलाचा दावा आहे.

>> एका नक्षलवादी महिलेचा मृतदेहही सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

(22 jawans killed following deadly encounter between Naxals and security forces in Chhattisgarh Sukma)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.