VIDEO: बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोप; जेसीबी पाण्यात बुडाला

| Updated on: May 26, 2021 | 12:31 PM

याठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. | yaas cyclone

VIDEO: बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोप; जेसीबी पाण्यात बुडाला
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सध्या यास चक्रीवादळाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दक्षिण 24 परगण्यात एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. येथील लोकांच्या मदतीसाठी हा जेसीबी आणण्यात आला होता. मात्र, याठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. या पाण्यात हा जेसीबी बुडाला. (JCB down in West bengal heavy rain due to yaas cyclone)

ओदिशामध्ये सकाळी नऊच्या सुमारास वादळाच्या लँडफॉलला सुरुवात झाली. त्यानंतर दक्षिण 24 परगण्यातही त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले.

(JCB down in West bengal heavy rain due to yaas cyclone)