AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rule Change 1st June : LPG महागला, कारही महाग.. देशभरात आजपासून 5 मोठे बदल ! तुमच्या खिशावर किती परिणाम ?

Rule Change From 1st June : 1 जूनपासून देशात अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती (LPG Price Hike) वाढवल्या असून, आता कारही महाग झाल्या आहेत.

Rule Change 1st June : LPG महागला, कारही महाग..  देशभरात आजपासून 5 मोठे बदल ! तुमच्या खिशावर किती परिणाम ?
देशात आजपासून 5 मोठे बदल
| Updated on: Jun 01, 2026 | 12:05 PM
Share

आज 1 जून. आजपासून नवा महिना, जून महिना सुरू झाला असून, देशात अनेक मोठ्या आर्थिक बदलांसह (Rule Change From 1st June) या नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर आणि प्रत्येकाच्या खिशावर होताना दिसणार आहे. महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती (LPG Commercial Cylinder Price Hike) वाढल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला महागाईचा फटका बसला आहे, तर दुसरीकडे कार घेणाऱ्यांचं स्वप्नही लाांबणीवर पडू शकतं. कारण मारुती सुझुकी कार शौकिनांनाही महागाईचा मोठा फटका बसला असून, त्यामुळे कार खरेदी करणे अधिक महाग झालं आहे. याशिवाय, यूपीआय (UPI) संबंधित नियमही बदलत आहेत.

देशात आजपासून 5 महत्वाचे बदल

देशभरात 5 मोठे बदल झाले असून त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावरही परिणाम होणार आहे.

पहिला बदल : LPG सिलेंडर महागला

दर महिन्याप्रमाणे, 1 जून 2026 रोजी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात सुधारणा करून नवीन दर (LPG Cylinder New Rates) जाहीर केले आहेत. घरगुती वापरासाठीच्या 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, पण तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. 2026 मधील ही आतापर्यंतची सातवी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 42 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत आता 3113.50 रुपये झाली आहे, तर कोलकातामध्ये त्याच्या दरात 52.50 रुपयांची वाढ झाली आहे.

याव्यतिरिक्त, पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी आणि पीएनजी दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे, जर एखाद्या ग्राहकाकडे आधीपासूनच पीएनजी कनेक्शन असेल, तर त्यांना 30 दिवसांच्या मुदतीत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल.

दुसरा बदल : Maruti कारही महागली

1 जूनपासून झालेला दुसरा मोठा बदल हा कारप्रेमींसाठी मोठा पटका ठरू शकतो. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी, मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या गाड्यांच्या दरातील वाढीची घोषणा केली असून, या नवीन वाढीव किमती आज, म्हणजेच 1 जूनपासून लागू होत आहेत. कंपनीने अल्टो, ब्रेझा आणि व्हिक्टोरिया यांसारख्या अनेक गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. मारुती सुझुकीच्या म्हणण्यानुसार, विविध मॉडेल्समध्ये ही दरवाढ कमाल 30 हजार रुपयांपर्यंत आहे.

तिसरा बदल : HDFC Bank चे नियम

जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून बँकिंग नियमांमध्येही बदल झाला आहे (Bank Rule Change) आणि 1 जून 2026 पासून, एचडीएफसी बँकेने करंट अकाऊंट खात्यांसह आपल्या अनेक खात्यांशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 1 जूनपासून लहान नोटा आणि नाण्यांच्या कॅश डिपॉझिटर नवीन मर्यादेसह नवीन शुल्क लागू झाले आहे. आतापर्यंत, या लहान नोटांच्या रोख ठेवींवर कोणतीही मासिक मर्यादा निश्चित केली नव्हती, परंतु नोटा जमा करण्यावर 4% आणि नाण्यांच्या ठेवींवर सुमारे 5 % शुल्क आकारले जात होते. आता यात बदल होत आहे.

बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमांनुसार, 20 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटांसाठी मासिक मर्यादा 10000 आहे, तर नाण्यांसाठी ही मर्यादा दरमहा 5000हे. या मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केल्यास त्यावर 2% अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. (टीप: या मर्यादेपलीकडे केलेल्या कोणत्याही अतिरिक्त ठेवींवर हे लागू होईल.)

चौथा बदल : Solar Panel महागणार ?

चौथ्या बदलाबद्दल सांगायचं झालं तर 1 जूनपासून सौर पॅनेलशी संबंधित नियम देखील बदलत आहेत. 1 जून 2026 पासून, सौर पॅनेलसाठी मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादक सूची (ALMM List-II) लागू होईल. याच्या अंमलबजावणीमुळे, सरकारी योजना आणि इतर अनुदानित प्रकल्पांमध्ये केवळ या सूचीमध्ये समाविष्ट असलेले सौर मॉड्यूल आणि सेल वापरणे आवश्यक असेल. त्यांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे आणि परिणामी, सौर पॅनेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पाचवा बदल : UPI ची नवी सिस्टीम

डिजिटल पेमेंटमधील ऑनलाइन फसवणूक आणि चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरित होण्याच्या दैनंदिन समस्येवर उपाययोजना करण्यासाठी, एनपीसीआयने (NPCI) 1 जून 2026 पासून एक नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार, कोणत्याही ऑनलाइन पेमेंट प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या कोणत्याही यूपीआय (UPI) व्यवहारात, पिन टाकण्यापूर्वी व्यक्तीच्या बँक खात्याचे नाव दिसेल, ज्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होणार नाहीत.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?