AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीतील पराभवापेक्षा लालूंना सर्वात मोठा झटका; थेट मुलीने घेतला खळबळजनक निर्णय, कुटुंबाशी..

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. एनडीएने महाआघाडीचा धुव्वा उडवला. कॉंग्रेससह आरजेडीला मोठा पराभव सहन करावा लागला. त्यामध्येच आता आरजेडीला पराभवापेक्षाही मोठा झटका बसला आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवापेक्षा लालूंना सर्वात मोठा झटका; थेट मुलीने घेतला खळबळजनक निर्णय, कुटुंबाशी..
Lalu Prasad Yadav daughter Rohini Acharya
| Updated on: Nov 15, 2025 | 4:41 PM
Share

बिहार विधानसभा 2025 चा निकाल नुकताच लागला असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. बिहार निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. आरजेडी आणि कॉंग्रेसलचा धुव्वा उडाला. आरजेडीला अत्यंत मोठा पराभवाचा सामना करावा लागला. लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित होतोय. त्यामध्ये आता लालूंच्या कुटुंबातील कलह पुढे आलाय. लालू प्रसाद यादवच्या लेकीने अत्यंत धक्कादायक असा निर्णय घेतला. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडत असल्याची मोठी घोषणा करत कुटुंबापासूनही दूर जात असल्याचा खळबळजनक निर्णय घेतला. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली. इंस्टाग्रामवर याबाबतची पोस्ट रोहिणी यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

लालू प्रसाद यादव यांची पार्टी आरजेडी संकटात असतानाच आता कुटुंबातही मोठी फुट पडल्याचे स्पष्ट होतंय. रोहिणी यांनी दावा केला की, त्यांनी संजय यादव आणि रमीझ यांच्या दबावाखाली हे पाऊल उचलले. त्यांच्या विधानामुळे आरजेडी गटात खळबळ उडाली आहे. निवडणुकीतील पराभवादरम्यान समोर आलेला कौटुंबिक कलह पक्षाच्या समस्या आणखी गुंतागुंतीच्या करू शकतो.

राष्ट्रीय जनता दलाने (RJD) देखील निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की ही एक अंतर्गत कुटुंबाची बाब आहे. भाजप नेते प्रदीप भंडारी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंब विरुद्ध कुटुंब असे भाकित हे खरे होताना दिसत आहे. मुळात म्हणजे लालूंच्या कुटुंबात मागील काही दिवसांपासून वाद उफाळताना दिसतोय. त्यामध्येच आता त्यांच्या लेकीने कुटुंबापासून आणि राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

रोहिणी या आपल्या वडिलांच्या पार्टीमध्ये सक्रिय होत्या. मात्र, कालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आरजेडीला मोठा धक्का बसला. तो पराभव होऊन अवघे काही तास होत नाहीत, तोवरच रोहिणी यांनी फक्त राजकारणच नाही तर थेट कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला. आरजेडीने स्पष्ट केले की, ही आमची काैटुंबिक बाब आहे. मात्र, आता ती काैटुंबिक बाब राहिली नसून देशभरात जोरदार चर्चा होताना दिसतंय.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...