Landslide in Manipur : मणिपूरच्या आर्मी कॅम्पजवळ भू्स्खलन, 7 मृतदेह बाहेर काढले, 30 ते 40 जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले

जखमींवर उपचार करण्यासाठी नोनी आर्मी मेडिकलचे युनिट आणण्यात आले आहे. काही नागरिकही या मातीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शक्यता आहे. वातावरणातील बिघाडामुळं शोध मोहिमेत अडचण येत आहे. सेनेचा हेलिकॅप्टरही घटनास्थळी पोहचला आहे.

Landslide in Manipur : मणिपूरच्या आर्मी कॅम्पजवळ भू्स्खलन, 7 मृतदेह बाहेर काढले, 30 ते 40 जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले
मणिपूरमध्ये ढिगाऱ्याखालील मृतदेह शोधताना सेनेचे जवान.
Image Credit source: ANI
| Updated on: Jun 30, 2022 | 4:01 PM

मणिपूरमध्ये (Manipur) काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळं भूस्खलनाची (Landslide) घटना समोर आली. बुधवारी रात्री नोनी जिल्ह्याच्या तुपूल रेल्वे स्थानकाजवळ भूस्खलनात 107 टेरिटोरीअल आर्मीचे जवान सापडले. त्यापैकी 30 ते 40 जवान मातीत दबले गेलेत. आतापर्यंत 7 जवानांचे मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आले. 13 भारतीय सेनेच्या (Indian Army) जवानांना बाहेर काढण्यात आलंय. तरीही 30 ते 40 जवान भूस्खलनात दबले गेलेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी तात्काळ मिटिंग बोलावली. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांची चमू पाठविण्यात आली आहे. आसाम आणि मणिपूरसह पूर्वोत्तर राज्यात पावसामुळं पूरपरिस्थिती आहे. आसाममध्ये दहा दिवसांत सुमारे 135 लोकांचा पुरामुळं बळी गेलाय. हवामान खात्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ

वातावरणातील बिघाडामुळे शोध मोहिमेत अडचण

जखमींवर उपचार करण्यासाठी नोनी आर्मी मेडिकलचे युनिट आणण्यात आले आहे. काही नागरिकही या मातीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शक्यता आहे. वातावरणातील बिघाडामुळं शोध मोहिमेत अडचण येत आहे. सेनेचा हेलिकॅप्टरही घटनास्थळी पोहचला आहे.

ढिगाऱ्यामुळे नदी ब्लॉक

जिल्हा प्रशासनानं ग्रामीण भागातील लोकांना जागा खाली करण्याचा सल्ला दिलाय. मातीच्या ढिगाऱ्यामुळं ईजाई नदी ब्लॉक झाली आहे. नदीतील पाणी साचल्यामुळं तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा ढिगारा फुटल्यास खालच्या भागात मोठं नुकसान होऊ शकते. सध्या बचावकार्य सुरू आहे. पण, वातावरणामुळं त्यात अडचण येत आहे.

एनडीआरएफची टीम घटनास्थळी

एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. माखून भागार रेल्वेचं बांधकाम सुरू होतं. त्याठिकाणी भूस्खलन झालं. भारतीय सेनेचे जवान मृत्यूमुखी पडले. याबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून घटनेची माहिती घेतली. शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलंय, असं बीरेन सिंह म्हणाले.