AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लश्कर-ए-तैयबा’कडून अंबाला रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी; शहराच्या सुरक्षेमध्ये वाढ

दहशतवादी संघटना असलेल्या लश्कर-ए-तैयबाकडून चंदीगढ आणि अंबाल रेल्वे स्टेशन बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अंबालाच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरला याबाबत एक पत्र पाठवण्यात आले आहे.

'लश्कर-ए-तैयबा'कडून अंबाला रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी; शहराच्या सुरक्षेमध्ये वाढ
काश्मिरमध्ये 135 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 1:14 PM
Share

अंबाला – दहशतवादी संघटना असलेल्या लश्कर-ए-तैयबाकडून चंदीगढ आणि अंबाल रेल्वे स्टेशन बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अंबालाच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरला एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये येत्या 26 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबरला रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रात हरियाणाचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना देखील धमकी देण्यात आली आहे. चंदीगढ आणि अंबाला सोबतच यमुनानगर, शिमला हे देखील रेल्वे स्टेशन आमच्या निशाण्यावर असल्याचे पत्रात म्हटले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर 

अंबाला हे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून संवेदनशील शहर असल्याने या पत्राची विशेष दखल घेण्यात आली आहे.  दरम्यान हे पत्र कोणी पाठवले? कुठून आले याचा शोध अंबाला पोलिसांकडून सुरू आहे. डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरच्या तक्रारीवरून या प्रकरणात एक जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोहम्मद अमीम शेख असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात 

बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे पत्र खरच लश्कर-ए-तैयबाकडून पाठवण्यात आले आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत. या पत्रामध्ये अंबाला, चंदीगढ रेल्वे स्टेशनसोबतच यमुना नगर, शिमला रेल्वे स्टेशन उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच रेल्वेच्या विविध पूलावर देखील बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात, तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल; राऊतांचा इशारा

India China conflict: भारतीय हद्दीत कोणतेही अतिक्रमण नाही, चीन LAC वर गाव वसावत असल्याचा USAच्या अहवालावर वाद चुकीचा – बिपिन रावत

Salman Khurshid Book Controversy:”हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं”- गुलाम नबी आझाद

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...