AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khurshid Book Controversy:”हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं”- गुलाम नबी आझाद

खुर्शीद यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत आझाद यांनी ट्विट केले की, "हिंदू धर्माच्या मिश्र संस्कृतीपासून वेगळे असलेली राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्वाशी आम्ही असहमत असलो, तरी ISIS आणि जिहादी इस्लामशी हिंदुत्वाची तुलना करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे.'

Salman Khurshid Book Controversy:हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद
Ghulam Nabi Azad
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 7:14 AM
Share

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकातील हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत खुलेआम असहमती दाखवली आहे. हिंदुत्वाची तुलना ISIS शी केली जाऊ शकते, हे चुकीचे आहे आणि अतिशयोक्ती असल्याचे, गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकात हिंदुत्वाबद्दल जी मतं मांडली आहेत, त्याच्यावरून सध्या देशात वाद सुरू आहे. (Congress Ghulam Nabi Azad disagrees with Salman Khurshid new book about Hindutva comparing with ISIS)

खुर्शीद यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत आझाद यांनी ट्विट केले की, “हिंदू धर्माच्या मिश्र संस्कृतीपासून वेगळे असलेली राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्वाशी आम्ही असहमत असलो, तरी ISIS आणि जिहादी इस्लामशी हिंदुत्वाची तुलना करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे.’

आझाद हे काँग्रेसच्या ‘G23’ गटाचे प्रमुख नेते आहेत. खुर्शीद यांनी अनेक प्रसंगी उघडपणे या गटावर टीका केली असून त्यांना गांधी घराण्याचे विश्वस्त मानले जाते.

काय म्हणाले सलमान खुर्शीद?

याबाबत विचारले असता खुर्शीद यांनी ‘एबीपी न्यूज’ ला सांगितले की, “हिंदू धर्म हा अत्यंत उच्च दर्जाचा धर्म आहे. यासाठी गांधीजींनी जी प्रेरणा दिली, त्याहून मोठी प्रेरणा दुसरी असूच शकत नाही. मी नवीन लेबल का स्वीकारू? कोणी हिंदू धर्माचा अपमान केला तरी मी बोलेन. मी म्हणालो, की जे हिंदुत्वाचे राजकारण करतात ते चुकीचे आहेत आणि ISIS देखील चुकीचे आहे.”

दरम्यान, राजधानी दिल्लीतील एका वकिलाने खुर्शीद यांच्याविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार नोंदवली आहे. वकील विवेक गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, खुर्शीद यांनी त्यांच्या “सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स” या पुस्तकात लिहिले आहे की, “ऋषी आणि संतांना ज्ञात असलेला सनातन धर्म आणि शुद्ध हिंदू धर्म (क्लासिकल हिन्दुइज्म) हे हिंदुत्वाचे असंस्कृत स्वरूप आहे. हे सर्व पॅरामीटर्स, ISIS आणि बोको हराम सारख्या गटांद्वारे अलीकडील वर्षांच्या जिहादी इस्लामची राजकीय आवृत्ती आहे.”

Other News

UP Elections 2022: निवडणुकीच्या रणनीतीवर उद्या अमित शाह घेणार वाराणसीत बैठक, भाजपचे सर्व 403 विधानसभा प्रभारी राहणार उपस्थित

Kangana Ranaut: ‘या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?’, भाजप खासदार वरुण गांधींची कंगनावर जोरदार टीका

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.