Kangana Ranaut: ‘या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?’, भाजप खासदार वरुण गांधींची कंगनावर जोरदार टीका

कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान होतो, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर होतो, आतातर शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार होतोय. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?", असा घणाघात त्यांनी केला.

Kangana Ranaut: 'या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?', भाजप खासदार वरुण गांधींची कंगनावर जोरदार टीका
कंगना.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी गुरुवारी त्यांच्या पक्षाच्या सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक – अभिनेत्री कंगना रणौतच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. ‘मी या विचारसरणीला वेडेपणा म्हणावा की देशद्रोह?’, वरुण गांधी म्हणाले. कंगनाने नुकतच एक वादग्रस्त वक्तव्य केलं की, देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर निवडून आल्यावर मिळाले. 1947 मध्ये अनेक दशकांच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षानंतर जे मिळाले ते म्हणजे “भीख”. (Varun Gandhi slams Kangana Ranaut over anti-national statements on India Independence)

कंगना हे वक्तव्य करतांनाची एक व्हिडिओ क्लिप शेअर करत त्यांनी कंगनाचा समाचार घेतला. गांधी यांनी ट्विट केले की, “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान होतो, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर होतो, आतातर शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार होतोय. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?”, असा घणाघात त्यांनी केला.

वरुण गांधी अलीकडे भाजपं पक्षापासून वेगळी भूमिका घेत अनेकदा त्यांची मतं मांडतायेत. काँग्रेस पक्ष चालवणाऱ्या नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्य, वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधीनी 2004 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपमध्ये सामील झाले. मात्र, अलिकडे दोघेही भाजप विरोधात वक्तव्य करतांना दिसतात.

Other News

सावरकर धार्मिक नेते नव्हते; हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी संबंध नाही, दिग्विजय सिंग यांचा भाजपावर निशाणा

भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला चूड लावायचीय, कामगारांनी राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनू नका; राऊत यांचं आवाहन

VIDEO: मच्छर आणि थंडीचा मारा सोसत पडळकर, खोत रात्रभर आझाद मैदानात; एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच

Published On - 4:55 pm, Thu, 11 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI