LIVE : ठाकरे पिता-पुत्रांचा दुष्काळी दौरा

राज्यासह देशातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर...

LIVE :  ठाकरे पिता-पुत्रांचा दुष्काळी दौरा
Picture

ठाकरे पिता-पुत्रांचा दुष्काळी दौरा

मुंबई : ठाकरे पिता-पुत्र आज दुष्काळी दौऱ्यावर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जालन्यात तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सांगोल्यात दुष्काळी दौऱ्यावर

09/06/2019,9:55AM
Picture

कारंज्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची जीवघेणी कसरत

वर्धा : कारंजा तालुक्यातील येनगाव येथे घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, पाण्यासाठी ग्रामस्थांना विहिरीत उतरावं लागतं, दिवसरात्र विहिरी, कुपनलिकांवर गर्दी, तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

09/06/2019,9:58AM
Picture

साताऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात

सातारा : शहरासह ग्रामीण भागात पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात, वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित, मात्र उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

09/06/2019,9:59AM
Picture

सोलापुरात पावसाच्या सरी

सोलापूर : शहर आणि जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले

09/06/2019,9:59AM
Picture

अकोल्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

अकोला : जिल्ह्यात सकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात, आपातापा, दोनवाडा, खिरपुरी, रिधोरा, बार्शीटाकळी, शिवणी या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पावसामुळे वातावरणात गारवा

09/06/2019,10:02AM
Picture

ढोकळा खाल्ल्याने पाच चिमुकल्यांना विषबाधा, प्रकृती गंभीर

रत्नागिरी : खेड शहरातील मुख्य बाजारपेठेत मिठाईच्या दुकानातील ढोकळा खाल्ल्याने 5 मुलांना विषबाधा, आजीने बाजारातून आणलेला ढोकळा खाल्ल्यानंतर मुलांना अस्वस्थ वाटू लागलं, मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती गंभीर

09/06/2019,10:01AM
Picture

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर हल्ला, दोघांना अटक

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयावरील हल्ल्या प्रकरणी दोघांना अटक, भोसरी पोलिसांची कारवाई

09/06/2019,10:05AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *