लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पाकिस्तानात लाईव्ह प्रक्षेपण

इस्लामाबाद (पाकिस्तान) : देशभरातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. देशात कोणाचे सरकार येणार यासाठी सर्वचजण 23 मे ची आतुरतेने वाट बघत आहे. लोकसभा निवडणुकीच्या 542 जागांचे निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. दरम्यान या निकालाचे लाईव्ह प्रक्षेपण थेट पाकिस्तानाची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखवण्यात येणार आहे. एकूण …

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पाकिस्तानात लाईव्ह प्रक्षेपण

इस्लामाबाद (पाकिस्तान) : देशभरातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. देशात कोणाचे सरकार येणार यासाठी सर्वचजण 23 मे ची आतुरतेने वाट बघत आहे. लोकसभा निवडणुकीच्या 542 जागांचे निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. दरम्यान या निकालाचे लाईव्ह प्रक्षेपण थेट पाकिस्तानाची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखवण्यात येणार आहे.

एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान पार पडलं असून, 23 मे रोजी म्हणजेच उद्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचा निकाल थेट पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये लाईव्ह दाखवला जाणार आहे. इस्लामाबादच्या उच्च आयोगात यासाठी विशेष तयारी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी मोठी स्क्रिनही लावली जाणार आहे.

यंदा देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या 8 हजारपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले. देशातील 543 जागांसाठी लोकसभेचे मतदान पार पडलं. देशात लोकसभेच्या सर्व जागांवर 90 कोटी मतदार होते. तसंच 2 हजार 293 पक्षांची लोकसभेसाठी लढत झाली.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला पार पडलं. त्यानंतर 18 एप्रिलला दुसरा टप्पा, 23 एप्रिलला तिसरा टप्पा आणि 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या चारही टप्प्यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर मतदान झाले. त्यानंतर 6 मे रोजी पाचवा टप्पा, 12 मे रोजी सहावा टप्पा आणि 19 मे रोजी सातव्या टप्प्यात यशस्वीपणे मतदान पार पडलं. लोकसभेच्या सातही टप्प्यातील मतदानाला जवळपास 43 दिवस लागले.

लोकसभा निवडणुकीसाठी सातही टप्प्यात मतदान पार पडलं. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर देशभरात कोणाचे सरकार येईल याबाबतचे एक्झिट पोल समोर आले. या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एनडीएचे सरकार येईल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान अवघ्या काही तासात देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *