OM Birla: ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभावर लोकसभेत चर्चा? अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टच सांगितले की…

Om Birla on CEC Gyanesh Kumar: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भात मोठे विधान केले. त्यांच्या कथित निर्णयावर लोकसभेत चर्चा होणार का? काय दिले त्यांनी उत्तर?

OM Birla: ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभावर लोकसभेत चर्चा? अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टच सांगितले की...
ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभावर लोकसभेत चर्चा? अध्यक्ष ओम बिर्ला यांचे उत्तर काय?
| Updated on: Oct 22, 2026 | 2:08 PM

Om Birla on CEC Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या महिनाभरात वातावरण तापलेले आहे. SIR प्रक्रिया, दोन सहकारी आयुक्तांची पत्रं, मतदार यादीतून अनेकांची नावं बाद होणं यावरून देशभरात मोठे आंदोलन उभे राहिले. ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभाराविरोधात इंडिया आघाडीसह काँग्रेस, घटक पक्ष आणि सीजेपी अजूनही मैदानात आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी विरोधक करत आहेत. त्याचवेळी सत्ता उलथवण्याची भाषाही विरोधकांकडून उघडपणे करण्यात येत आहे. त्याचवेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याविषयी प्रश्न करण्यात आला. तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं.

एका पक्षाला ज्ञान पाझळणे योग्य नाही

Loading...

राज्य घटनेत याविषयीची खास तरतूद आहे. त्या घटनात्मक प्रक्रियेनुसारच पुढील गोष्टी होतील. तुम्ही जर त्यातील अनुच्छेद पाहिले तर त्यात लोकसभा अध्यक्षांची भूमिका सुद्धा विषद केली आहे. जेव्हा आमच्या भूमिकेची वेळ येईल, तेव्हा तुम्हाला सांगूच असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले. लोकसभा अध्यक्ष हा दोन्ही पक्षांबाबत सारखीच भूमिका घेतो. तो सत्ताधारी आणि विरोधकांचाही असतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी संसदेच्या मर्यादा, संस्कृतीचे पालन करणे आवश्यक आहे. आम्हाला केवळ एकाच बाजूच्या व्यक्तींना ज्ञान देण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लगावला.

विरोधकांच्या प्रस्तावानंतर चर्चा

तर यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेत ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविषयी, SIR विषयी चर्चा होईल का यावर उत्तर दिले. विरोधकांच्या प्रस्तावानंतर ज्ञानेश कुमार यांच्याबाबत चर्चा होईल. पण याविषयी तुम्ही राजकीय पक्षांना विचारणा करा, असे ते म्हणाले. संविधानाच्या प्रक्रियेनुसारच संसदेचे कामकाज चालतं. विरोधक प्रस्ताव देतील तेव्हा ज्ञानेश कुमारांविषयी चर्चा होईल असे ते म्हणाले.

विरोधक ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर ठाम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आठवडाभर दिल्ली दणाणून सोडली. विविध आयुधांचा वापर करत काँग्रेसने निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर भाजप मुख्य निवडणूक आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभारावर लोकसभेत विरोधकांनी प्रस्ताव आणल्यास चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यावर विरोधक काय भूमिका घेतात हे लवकरच समोर येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us