AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Booking: बुकिंगनंतरही करावी लागतेय बरीच परीक्षा? किती दिवसांत मिळेल सिलिंडर; सरकारनेच केलं स्पष्ट

LPG Booking: एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतरही डिलिव्हरीसाठी तुम्हाला बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे का? आता सरकारने याबद्दलची माहिती दिली आहे. सिलिंडर बुक केल्यानंतर किती दिवसांत तुम्हाला मिळेल, याबद्दलची माहिती सरकारने दिली आहे.

LPG Booking: बुकिंगनंतरही करावी लागतेय बरीच परीक्षा? किती दिवसांत मिळेल सिलिंडर; सरकारनेच केलं स्पष्ट
LPG CylinderImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 12, 2026 | 8:23 AM
Share

एलपीजी गॅस सिलिंडरबद्दल अजूनही सर्वसामान्यांमध्ये चिंता असल्याचं दिसत आहे. परंतु भारत सरकारने स्पष्ट केलं आहे की देशात एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे साठेबाजी करू नका आणि घाबरून बुकिंग करण्याची घाई करू नका, असा आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. एलपीजी सिलिंडर बुकिंगसंदर्भातले नवे नियम पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहेत. आता शहरी भागात 25 दिवसांच्या आत सिलिंडर बुक करता येणार आहे. पण गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तो तुम्हाला किती दिवसांत मिळेल, हे माहीत आहे का?

किती दिवसांत गॅस सिलिंडर बुक करू शकता?

  • तुम्ही शहरात राहत असाल, तर 25 दिवसांत एलपीजी सिलिंडर बुक करू शकता.
  • तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर 45 दिवसांच्या आता सिलिंडर बुक करता येतं.

बुकिंगनंतर किती दिवसांत सिलिंडर उपलब्ध होईल?

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं की, एलपीजी सिलिंडर वितरणाला पूर्वीपेक्षा थोडा जास्त वेळ लागत आहे. “पूर्वीच्या तुलनेत सिलिंडर वितरणात थोडा विलंब होत आहे. पूर्वी सिलिंडर दोन ते तीन दिवसांत मिळायचं, पण आता नागरिक घाबरून अधिक प्रमाणात बुकिंग करत आहेत. त्यामुळे डिलिव्हरीला चार ते पाच दिवस किंवा काही ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त काळ लागू शकतो”, असं त्या म्हणाल्या. ही परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे देशभरात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला. एलपीजीच्या पुरवठ्याबाबत दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आता सरकारने ग्राहकांना घाबरून खरेदी न करण्याचा आणि अनावश्यक एलपीजी बुकिंग न करण्याचा इशारा दिला आहे. एलपीजी सिलेंडरसाठी अनेक नागरिक थेट वितरकांकडे जाऊन रांगा लावताना दिसत आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नागरिकांना डिजिटल बुकिंग माध्यमांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून वितरण सुव्यवस्थित होईल आणि पुरवठ्यातील व्यत्यय टाळता येईल. त्यातही अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) अनिवार्य करण्यात आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...