AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG सिलेंडर विकत घेताना विसरू नका हे 3 ‘गोल्डन रूल्स’, घाईघाईत कराल मोठी चूक

LPG Cylinder Delivery Safety Tips: जर तुमच्या घरातंही तुम्ही एलपीजी सिंलेडर (LPG) वापरत असाल, तर सिलेंडरची डिलीव्हरी घेताना काही गोष्टी विशेष लक्षात ठेवा. हे तीन नियम पाळाल तर कधीच होणार नाही तुमचं नुकसान

LPG सिलेंडर विकत घेताना विसरू नका हे 3 'गोल्डन रूल्स', घाईघाईत कराल मोठी चूक
एलपीजी डिलीव्हरी
| Updated on: Apr 07, 2026 | 2:24 PM
Share

LPG Cylinder Delivery Safety Tips : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन संकट असून भारतातही इंधनाचा, एलपीजीचा तुटवडा दिसून येत आहे. एलपीजीच्या क्रायसिसच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या ग्राहकांना एलपीजीबद्दल सातत्याने जागरूक करत आहेत. एलपीजीचा पुरवठा सामान्य आहे असं आश्वासन ऑईल मार्केटिंग कंपन्या ग्राहकांना सातत्याने देत असून आपल्या गरजेनुसार घरबसल्या सिलेंडर बुक करावेत, असंही आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात, भारत पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर ग्राहकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही सिलेंडर बुक केला असेल आणि तुम्हाला वेळेवर डिलिव्हरी मिळणार असेल, तर घाईघाईने सिलेंडर घेणे टाळा. Bharat Petroleum च्या सांगण्यानुसार, LPG सिलेंडर घेताना ग्राहकांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे सिलेंडर घेताना 3 गोल्डन रूल्स नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.

नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी

सिलेंडरचं वजन

एलपीजी सिलेंडर खरेदी करताना पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे त्याचं वजन तपासणं. सिलेंडरची डिलिव्हरी झाल्यावर, तुम्ही डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला सिलेंडर वजनकाट्यावर तोलण्यास सांगू शकता. यामुळे पूर्ण प्रमाणात गॅस मिळतो की नाही ते नीट कळतं आणि त्यात कोणतीही कमतरता राहिली नाही ना याची खात्री होते. ग्राहक अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात, पण त्यामुळे कमी गॅस मिळून नुकसान होऊ शकतं.

गॅस लीकेज

सिलेंडरची डिलिव्हरी स्वीकारण्यापूर्वी, गॅस गळती किंवा लीकेड होत नाहीये ना हे नीट तापसून खात्री करून घ्या. हे करण्यासाठी, गॅसचा रेग्युलेटर बसवण्यापूर्वी येणारा कोणताही हलका वास किंवा आवाजाकडे लक्ष द्या. जर तुम्हाला गॅसचा वास येत असेल किंवा कोणतीही संशयास्पद परिस्थिती वाटली, तर सिलेंडर घेण्यास ताबडतोब नकार द्या आणि संबंधित डिलिव्हरी एजंटला लगेच कळवा. गॅस गळती हा एक गंभीर धोका आहे. ज्यामुळे आग लागण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका वाढतो.

कॅश मेमोनुसार पेमेंट

एलपीजी सिलेंडर खरेदी करताना लक्षात ठेवण्याची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या कॅश मेमोवर (पावतीवर) जो आकडा लिहीलेला असेल, नेमकी तेवढीच रक्कम द्यावी. काहीवेळा असं होतं की लोकं पावती नीट न तपासता पैसे देतात, ज्यामुळे जास्त पैसे आकारले जाऊ शकतात. म्हणूनच, डिलिव्हरी झाल्यावर बिल नक्की तपासा आणि त्यानुसारच पैसे द्या. यामुळे पारदर्शकता टिकून राहते आणि फसवणूकही टाळता येते.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?