AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय! बुकिंगपूर्वी जाणून घ्या नवीन नियम, अन्यथा…

जर तुम्ही देखील LPG सिलेंडर बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नुकतेच सरकारने LPG सिलेंडरबाबत मोठे अपडेट दिली आहे.

LPG गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय! बुकिंगपूर्वी जाणून घ्या नवीन नियम, अन्यथा...
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 17, 2026 | 1:03 PM
Share

LPG Cylinder: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा क्षेत्रावर दिसून येत असला तरी भारतातील एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी पुरवठा पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी स्पष्ट केले की, भारतातील गॅस पुरवठा साखळी मजबूत आहे आणि एलपीजीची कमतरता भासणार नाही. काही माध्यमांमध्ये आलेल्या पुरवठा सामान्य होण्यासाठी 4-5 वर्षे लागतील या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे सरकारने सांगितले. सरकारच्या माहितीनुसार, सुमारे 8 लाख मेट्रिक टन एलपीजी आयात आधीच निश्चित करण्यात आली असून ती भारताकडे येत आहे.

उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना

9 मार्च रोजी जारी केलेल्या एलपीजी नियंत्रण आदेशानुसार रिफायनऱ्यांना उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशांतर्गत उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुरवठा साखळीवर ताण पडल्याने एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांबरोबरच हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योगांवरही झाला आहे.

वितरण व्यवस्था अधिक मजबूत

देशातील एलपीजी वितरकांची संख्या 13,896 वरून 25,607 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पुरवठा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे होण्यास मदत होत आहे. ऑनलाइन बुकिंग सुमारे 98%. डीएसी-आधारित डिलिव्हरी सुमारे 93%. यामुळे पारदर्शकता वाढली असून वितरण अधिक व्यवस्थित झाले आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एलपीजी पुरवठ्यावर देखरेख ठेवण्याचे आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

प्राधान्यक्रम ठरवले

कमर्शियल एलपीजी पुरवठ्यात रुग्णालये, शाळा, आवश्यक उद्योग यांना प्राधान्य दिले जात आहे. प्रवासी कामगारांसाठी 5 किलोचे छोटे एलपीजी सिलेंडर अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिले जात आहेत. सरकारने नागरिकांना PNG वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे, विशेषतः ज्या भागात पाइपलाइन सुविधा उपलब्ध आहे.

PNG चे फायदे

सतत पुरवठा, दीर्घकालीन स्वस्त, सुरक्षित. मात्र, सध्या देशातील केवळ 12-13% घरांमध्ये (सुमारे 1.6 कोटी) PNG कनेक्शन आहे. PNG नेटवर्क वाढवण्यासाठी सरकार 5000 ते 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. पाइपलाइन खर्चाच्या सुमारे 50% पर्यंत सहाय्य दिले जाऊ शकते.

पूर्वी भारतातील सुमारे 90% गॅस पुरवठा ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ मार्गे होत होता. मात्र 24 मार्चपर्यंत खाडी देशांमधील आयात 55% पर्यंत घटली, ज्यामुळे पुरवठ्याचे स्रोत विविध करण्यावर भर दिला जात आहे.

Follow Us
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र