AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke-Sharad Pawar : शरद पवारांसमोर अभिजीत दीपके महाराष्ट्रातल्या विरोधकांबद्दल काय म्हणाले?

Abhijeet Dipke-Sharad Pawar : शरद पवार यांनी आज जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी अभिजीत दीपकेंसोबत त्यांनी चर्चा केली. कॉकरोच जनता पार्टीने काल संसदेवर मार्च काढला होता. त्यावेळी लाठीचार्ज आणि झडपा झाल्या.

Abhijeet Dipke-Sharad Pawar :  शरद पवारांसमोर अभिजीत दीपके महाराष्ट्रातल्या विरोधकांबद्दल काय म्हणाले?
abhijeet dipke
| Updated on: Jul 21, 2026 | 4:12 PM
Share

महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी आज दिल्लीत जंतर-मंतरवर जाऊन कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याशी शरद पवार यांनी संवाद साधला. शरद पवार हे आंदोलन करणाऱ्या मुलांची स्थिती जाणून घेण्यासाठी तिथे आले होते. अभिजीत दीपके यांनी यावेळी पवारांशी बोलताना त्यांना काय-काय समस्या येत आहेत, त्या बद्दल सांगितलं. अभिजीत दीपके मीडियाशी बोलत होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांकडून सहकार्य मिळालय का? असा प्रश्न विचारला. त्यावर “महाराष्ट्रातील विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहेत. शरद पवार असो की उद्धव ठाकरे सर्व सोबत आहेत. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांबाबत विचारलं. सुप्रिया सुळेंनी फोन केला होता. इथे बॅरिकेड्स आहे. त्यामुळे पवार साहेबांना आम्ही आत घेऊन जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांबाबत शरद पवार अत्यंत चिंतीत होते. सर्वच लोक येतील. अनेक लोक येऊन गेले” असं अभिजीत दीपके म्हणाले.

कॉकरोच जनता पार्टीने काल संसदेवर मार्च काढला होता. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हिंसाचार झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडपा झाल्या. जवळपास 118 पोलीस कर्मचारी जखमी झाले. टीव्हीवरच्या वेगवेगळ्या दृश्यामध्ये पोलीस आंदोलकांना मारहाण करताना दिसत होते. दोन्ही बाजूंनी लोक जखमी झाले.

..तेव्हा एकही विरोधी पक्षाचा नेता दिसला नाही

दरम्यान कालच्या आंदोलनात एकही विरोधी पक्षाचा मोठा नेता दिसला नाही. याआधी सोनम वांगचूक यांचं उपोषण चालू असताना विरोधी पक्षाचे नेते तिथे येऊन भेट देत होते. पण काल संसदेवर मार्च निघाला, त्यावेळी ज्या घटना घडल्या, तेव्हा एकही विरोधी पक्षाचा नेता दिसला नाही. त्यावर आज बरीच चर्चा झाली. विरोधी पक्षांवर सडकून टीका झाली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज थेट जंतर-मंतरवरच चर्चेसाठी पोहोचले.  संजय राऊत यांनी गरज पडली तर आम्ही सुद्धा इथे येऊन बसू असं म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...