AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू-कश्मीरात मोठी चकमक, चतरु वनात जैशच्या दोघा अतिरेक्यांना कंठस्नान

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील चतरू वनक्षेत्रात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली आहे. गेल्याच महिन्यात एक सैनिक शहीद झाला होता.त्यानंतर सैन्य दलाने संयुक्त मोहिम राबवत दोघांना कंठस्नान घातले.

जम्मू-कश्मीरात मोठी चकमक, चतरु वनात जैशच्या दोघा अतिरेक्यांना कंठस्नान
Major encounter in Jammu and Kashmir
| Updated on: Feb 23, 2026 | 8:05 PM
Share

जम्मू- कश्मीरच्या किश्तवाड येथे सुरक्षादलांना मोठे यश मिळाले आहे. किश्तवाड या दुर्गम भागात सुरक्षा दलाने संयुक्त ऑपरेशन चालवत जैश-ए-महंमदच्या दोघा अतिरेक्यांना ठार केले आहे. ऑपरेशन ‘त्राशी-1’ अंतर्गत ही चकमक झडली असून यात दोन अतिरेकी जागीच ठार झाले असून घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्रास्रे आणि दारुगोळ्या जप्त करण्यात आला आहे.

या भागात अतिरेक्यांचा अड्डा असून ते घुसखोरीच्या तयारीत असल्याचे गुप्त माहिती मिळाल्यानंतर किश्तवाड येथील दुर्गम भागात सुरक्षा दलांनी संयुक्त मोहिम राबवून मोठे यश मिळवले. ऑपरेशन ‘त्राशी-1’ अंतर्गत झालेल्या या कारवाईत दोन अतिरेकी ठार झाले आहेत.या वेळी अनेक शस्रास्रे घटनास्थळी सापडली. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा एजन्सीने संयुक्त रुपाने केलेल्या ऑपरेशन ‘त्राशी-1’ सुरु केली आहे. यावेळी मिळालेल्या इनपुटनुसार जम्मू‑कश्मीर पोलिस, आयबी तसेच सैन्यातील गुप्तचर माहितीनुसार अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली.

दोन अतिरेक्यांना कंठस्नान

यानंतर व्हाईट नाईट कॉर्प्सच्या सीआयएफ डेल्टा तुकडीने पोलिस आणि सीआरपीएफच्या सोबत मिळून या भागात सखोल शोध मोहिम सुरु केली. शनिवारी सकाळी ११ वाजता दुर्गम डोंगराळ भागात अतिरेक्यांशी संपर्क स्थापण झाला. त्यानंतर चकमक सुरु करण्यात आली. सुरक्षा दलांनी अचूक रणनिती, योग्य समन्वय आणि आक्रमक कारवाई करत संपूर्ण विभागाला घेरले. यात दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

झडती मोहिम सुरु, मोठा साठा हस्तगत

या वेळी घटनास्थळावरुन युद्धाच्या सज्जतेला साजेसे दारु गोळा सापडला आहे. यात दोन एके – 47 रायफलींचा समावेळ आहे. संपूर्ण भागात झडती मोहिम सुरु आहे. अन्य अतिरेकी लपलेले आहेत का याची खातरजमा केली जात आहे. सुरक्षा एजन्सीने या कारवाईला या भागातील अतिरेक्यांविरोधातला मोठे यश मानले जात आहे.

Follow Us
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप
मराठा आरक्षणावर ठाम भूमिका: निर्णायक आंदोलनाचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा