AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका महिला नेत्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
| Updated on: Jul 16, 2026 | 3:04 PM
Share

माजी मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री ते राजकीय नेत्या झालेल्या पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या राज्यसभा खासदार कोयल मलिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या त्या चौथ्या खासदार आहेत. कोयल यांच्या आधी 3 खासदारांनी पक्षाची साथ सोडली आहे.

कोयल मलिक यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा राज्यसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु कोयल मलिक यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची संख्या 9 वर पोहोचली आहे. याआधी देखील तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी विविध कारण देऊन खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

कोयल मलिक यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. त्यांच्या राजीनाम्याची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु तृणमूल काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याबाबतही पक्षाने कोणतंही भाष्य केलेलं नाही.

तृणमूल काँग्रेस लवकरच याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करू शकते. सध्या सर्वांच्या नजरा या कोयल मलिक यांचा राजीनामा स्वीकारला जातो का, याकडे लागल्या आहेत. कोयल मलिक यांचं खरं नाव हे रुक्मिणी मल्लिक आहे. त्यांनी अनेक बंगाली सिनेमात काम केलं आहे. कोयल मलिक याच वर्षी एप्रिल महिन्यात राज्यसभा खासदार झाल्या होत्या. कोयल मलिक यांच्या राजीनाम्यावर अद्याप ममता बॅनर्जी यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आता कोयल यांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जी काय प्रतिक्रिया देतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

माजी मुख्यमंत्र्यांची जवळच्या नेत्यानेही सोडली साथ

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मानला जाणारा सर्वात जवळचा नेता आमदार मदन मित्रा यांनीही बुधवारी त्यांची साथ सोडली दिला. त्यानंतर ते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील गटात सामील झाले. परंतु आमदार मदन मित्रा यांनी पक्ष सोडला नसल्याचा दावा केला आहे.

Follow Us
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?