AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का, काँग्रेसने पाठ फिरवली, वारंवार संपर्क साधत राहिल्या, नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. ऐन पोटनिवडणुकीत काँग्रेसने पाठ फिरवली आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांचं टेन्शन वाढलं आहे.

mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का, काँग्रेसने पाठ फिरवली, वारंवार संपर्क साधत राहिल्या, नेमकं काय घडलं?
Mamata banerjee Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 15, 2026 | 7:43 AM
Share

ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हाने संपेना झाली आहेत. पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीआधी ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. नंदीग्राम पोटनिवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी संपर्क साधला. परंतु काँग्रेसने ममता बॅनर्जी यांचा प्रस्ताव फेटाळला. परंतु अधिकृरित्या कोणीही अद्याप दुजोरा दिलेला नाही. काँग्रेस रेजीनगर आणि नंदीग्रामच्या जागेवरून उमेदवार उतरवणार आहेत.

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसकडे मदत मागितली. त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांच्याशी संवाद साधला. बॅनर्जी यांनी रेजीनगर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून पाठिंबा मागितला. तर नंदीग्रामची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शवली. ममता बॅनर्जी यांची काँग्रेससोबत युती करण्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सायंकाळी काँग्रेस महासचिव वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडे निवडणुकीसीठी एक प्रस्ताव मांडला. त्यांनी नंदीग्राममध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर रेजीनगरमध्ये काँग्रेसकडून पाठिंबा मागितला. परंतु काँग्रेसने नकार दिल्याची माहिती आहे. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची देखील तयारी दर्शवली. या सर्व घडामोडींवर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने कोणतंही भाष्य केलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूलचं सरकार असताना काँग्रेस कार्यकर्त्यांवर केलेल्या अत्याचारामुळे प्रस्ताव अमान्य केल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शुभांकर सरकार यांच्या मतानुसार, आम्ही टीएमसीशी युती करू इच्छित आहे, पण त्यांनी नंदीग्राम आणि रेजीनगर पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा द्यावा’.

टीएमसीने नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी संचिता प्रधान यांना उमेदवारी दिली आहे. रेजीनगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत रबीउल आलम चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. परंतु प्रधान यांच्या उमेदवारीवरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे. 2014 साली झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात प्रधान यांचं नाव समोर आलं होतं, यावरून स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवत आहेत. दुसरीकडे काँग्रेसने दोन्ही जागेवर उमेदवार घोषित केले आहेत. रेजीनगरमधून मोहम्मद अब्दुल्लाहिल काफी यांना उमेदवारी दिली. तर नंदीग्राममधून मिलन प्रधान यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. दोन्ही जागेवर 6 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती