AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; ममता बॅनर्जींनी कोणाला मैदानात उतरवलं? भाजपसमोर कोणाचं आव्हान?

पश्चिम बंगालमधील दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहेत. या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत .

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; ममता बॅनर्जींनी कोणाला मैदानात उतरवलं? भाजपसमोर कोणाचं आव्हान?
mamta banerjeeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 9:29 AM
Share

पश्चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवारांची घोषणा केली आहे. टीएमसीने नंदीग्राममध्ये संचिता प्रधान आणि रेजीनगरमध्ये रबीऊल आलम चौधरी यांना उमेदवारी दिली.

टीएमसीने रविवारी सोशल मीडियावर एक अधिकृत पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये म्हटलं की, ममता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात तृणमूल काँग्रेसने नंदीग्राम आणि रेजीनगरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. संचिता प्रधान आणि रबीउल आलम चौधरी यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा. आम्हाला अपेक्षा आहे की दोघे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील.

पश्चिम बंगामध्ये दोन विधानसभा मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी अखेर तृणमूल काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेस पक्षाने म्हटलं की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पश्चिम बंगालच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी दोन नावांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रेजीनगर विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद अब्दुल्लाहिल काफी यांना उमेदवारी मिळाली आहे. तर नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून मिलन प्रधान यांना उमेदवारी दिली आहे.

दोन ठिकाणी पोटनिवडणुका का घेण्यात येत आहे?

पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने शुभेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भबानीपूर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. तर आम जनता उन्नय पार्टीचे संस्थापक हुमायूं कबीर हे देखील रेजीनगर आणि नौदा या दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी दोन्ही मतदारसंघात बाजी मारली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा भबानीपूर मतादरसंघात पराभव केला. त्यानंतर नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ सोडला. तर हूमायू कबीर यांनी नौदी मतदारसंघातून आमदारकी कायम ठेवली. त्यानंतर रेजीनगरमधील आमदारकी सोडली.

कधी होणार निवडणुका?

निवडणूक आयोगाने दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी 6 ऑक्टोबर तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर असणार आहे. यंदा तृणमूल काँग्रेसचे दोन गट पोटनिवडणुकीत उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!