मोठी बातमी! व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर उत्तर कोरियाचा भीषण हल्ला, एकामागून एक मिसाईल.., जगभरात मोठी खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, उत्तर कोरियानं भीषण हल्ला केला आहे, विशेष म्हणजे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांमध्येच उत्तर कोरियाकडून मिसाईल हल्ला करण्यात आला आहे, त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं शनिवारी व्हेनेझुएलावर हल्ला केला, अमेरिकन सैन्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे, तर दुसरीकडे आता नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नॉर्थ कोरियानं साउथ कोरियावर मिसाईल हल्ला केला आहे. सोबतच नॉर्थ कोरियाकडून आता मिसाईलच प्रोडक्शन देखील वाढवलं जात आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे -म्युंग हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. ली जे -म्युंग हे चीनच्या दौऱ्यावर असतानाच आता उत्तर कोरियानं दक्षिण कोरियावर मिसाईल हल्ला केला आहे. रविवारी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर भीषण हल्ला केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच उत्तर कोरियानं दक्षिण कोरियावर हल्ला केला आहे.
अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर अता उत्तर कोरियानं दक्षिण कोरियावर हल्ला केला आहे, उत्तर कोरियामध्ये हालचाली वाढल्या असून, जगावर आणखी एक मोठं संकट येण्याचे हे संकेत आहेत, कारण उत्तर कोरियानं आपल्या शस्त्रास्त्रांचं उत्पादन दुपटीने वाढवलं आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियानुसार किम जोंग उन यांनी आपल्या देशातील मिसाईलचं उत्पादन दुपटीने वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जगाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोरियावर हल्ला
उत्तर कोरियानं अनेक मिसाईल दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले आहेत. विशेष म्हणजे जेव्हा दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती हे चीनच्या दौऱ्यावर असताना उत्तर कोरियानं हा हल्ला केला आहे. उत्तर कोरियाच्या अण्ववस्त्र कार्यक्रमावर चर्चा व्हावी हा देखील त्यामागे एक उद्देश असल्याचं बोललं जात आहे.
दक्षिण कोरियाने बोलावली अपतकालीन बैठक
दक्षिण कोरियाने या हल्ल्यानंतर अपतकालीन बैठक बोलावली आहे, दक्षिण कोरियामध्ये देखील हालचालींना वेग आला असून, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे जपान आणि दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियानं केलेल्या या मिसाईल हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
