मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय! दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; पण किती दिवसांचा मिळणार?

Railway Employees Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वी ७८ दिवसांचा बोनस खात्यात जमा होणार आहे.

मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय! दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; पण किती दिवसांचा मिळणार?
| Updated on: Oct 14, 2026 | 4:47 PM

केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना एक महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. या बोनससाठी २,००९ कोटी मंजूर केले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी दिवाळी भेट दिल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की, मोदी मंत्रिमंडळाने तीन मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या कामगिरीवर आधारित बोनसला मंजुरी देण्यात आली आहे. हा बोनस दिवाळीपूर्वी अंदाजे ११.५ लाख कर्मचाऱ्यांना वितरित केला जाईल. ज्यासाठी ₹२,००९ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ११,४०,७७० रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना ७८ दिवसांचा उत्पादकता आधारित बोनस (PLB) म्हणून ₹२००९.६१ कोटी देण्यास मंजुरी दिली आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्ट्यांपूर्वी पीएलबी दिला जातो. यावर्षीही अंदाजे ११.४० लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराएवढा पीएलबी दिला जात आहे.

प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला ७८ दिवसांसाठी कमाल १७,९५१ रुपये दिले जातील. ही रक्कम रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध श्रेणींना दिली जाईल, जसे की ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट्स, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड्स), स्टेशन मास्टर्स, सुपरवायझर्स, टेक्निशियन्स, टेक्निशियन हेल्पर्स, पॉइंट्समन, मंत्रालयीन कर्मचारी आणि इतर गट ‘क’ कर्मचारी. २०२५-२६ मध्ये रेल्वेने अपवादात्मक कामगिरी केली. रेल्वेने विक्रमी १६७० दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आणि अंदाजे ७.४१ अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, दिव्यांगांसाठी असलेली पूर्वीची ८०% ची मर्यादा आता निम्मी करून ४०% करण्यात येईल. याशिवाय दिव्यांगांना आता वयाच्या १८ व्या वर्षापासून जन्मापासून निवृत्तीवेतन मिळेल. सामाजिक सुरक्षा जाळ्याचा विस्तार करून ते ५३,४२८ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us