AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD : मान्सून दाणादाण उडवणार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झोडपणार, देशातील या भागाला अलर्ट जारी

IMD Heavy Rain Alert : महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झाली असून तिचा परिणाम देशाच्या अनेक भागांवर दिसू लागला आहे.

IMD : मान्सून दाणादाण उडवणार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झोडपणार, देशातील या भागाला अलर्ट जारी
Heavy Monsoon Rain Alert News
| Updated on: Jun 07, 2026 | 7:23 PM
Share

मान्सून भारतात दाखल झाल्यापासून अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आता आगामी काळात मान्सून नागरिकांची दाणादाण उडवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झाली असून तिचा परिणाम देशाच्या अनेक भागांवर दिसू लागला आहे. या प्रणालीमुळे बिहारसह पश्चिम बंगाल, ओडिशा आणि संपूर्ण ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ईशान्य भारतासोबतच पश्चिम बंगालच्या किनारी आणि उत्तर जिल्ह्यांमध्येही या चक्राकार प्रणालीचा तीव्र परिणाम दिसून येणार आहे. कोलकाता, दीघा, हावडा तसेच उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांत सकाळपासूनच अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे, पुढील 48 तास असेत हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने बिहारच्या मैदानी भागातील नागरिकांना पुढील 96 तास हवामान आणखी गंभीर होण्याचा इशारा दिला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह 50 ते 70 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

विजा पडण्याचा घोका

वादळी वाऱ्यांसोबतच बिहारच्या विविध भागांत वीज पडण्याचाही मोठा धोका व्यक्त करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना वादळाच्या काळात मोकळ्या मैदानात किंवा मोठ्या झाडाखाली थांबू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे आणि विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या भागात काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. समुद्रकिनारी भागात मान्सून सक्रिय झाल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसासोबत हायटाइडचाही इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या ढगांमुळे तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे.

ईशान्य भारतात पूरसदृश परिस्थिती

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात आर्द्र वारे भारताच्या मुख्य भूभागाकडे सरकत आहेत. या चक्रवाती प्रणालीचा सर्वाधिक परिणाम ईशान्य भारतातील राज्यांवर होत असून, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. डोंगराळ भागांत सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले धोकादायक पातळीवर वाहू लागले आहेत. अनेक सखल आणि संवेदनशील भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

महाराष्ट्रातील मान्सूनचा वेग, बंगालच्या उपसागरातील चक्रवात आणि बिहारमधील वादळी परिस्थिती या तिहेरी हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांतील प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. नियंत्रण कक्ष 24 तास सक्रिय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात कोणतीही मोठी हाणी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं.

FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख.

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर….

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video.

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video