Ship hijacked | भारतीय सदस्यांच जहाज अरबी समुद्रात हायजॅक, भारतीय नौदलाची तात्काळ Action

Ship hijacked | भारतीय सदस्य असलेल्या जहाजाच अरबी समुद्रात अपहरण करण्यात आलय. भारतीय नौदलाने तात्काळ पावल उचलली असून आपल एक विमान आणि युद्धनौका ऑपरेशनसाठी पाठवून दिलीय.

Ship hijacked | भारतीय सदस्यांच जहाज अरबी समुद्रात हायजॅक, भारतीय नौदलाची तात्काळ Action
Indian Navy
Image Credit source: Representative image
| Updated on: Jan 05, 2024 | 1:54 PM

नवी दिल्ली : सध्या समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले करुन त्यांचं अपहरण करण्याच प्रमाण वाढलं आहे. ‘एमव्ही लिला नॉरफोल्क’ हे व्यापारी जहाज गुरुवारी संध्याकाळी सोमालियाच्या किनाऱ्याजवळ हायजॅक करण्यात आलं. ‘एमव्ही लिला नॉरफोल्क‘ च्या क्रू मध्ये 15 भारतीय आहेत. या अपहरणाबद्दल माहिती मिळताच भारतीय नौदलाने तात्काळ पावल उचलली. एक टेहळणी विमान आणि INS चेन्नई ही युद्धनौका सोमालियच्या दिशेने रवाना केली आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. UKMTO वेबसाइटवरुन जहाज अपहरणाबद्दल अलर्ट मिळाला. 5 ते 6 अपहरणकर्ते जहाजात चढल्याची माहिती मिळाली.

शुक्रवारी सकाळी भारतीय नौदलाच विमान हायजॅक जहाजाजवळ पोहोचलं. विमानाच हायजॅक जहाजावरुन उड्डाण सुरु आहे व संपर्क साधला. जहाजावरील कर्मचारी सुरक्षित आहेत. भारतीय नौदलाच टेहळणी विमान ‘एमव्ही लिला नॉरफोल्क’च्या मागावर असून जहाजावरील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे.

भारतीय नौदलाने काय म्हटलय?

परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या भागातील विविध यंत्रणांबरोबर समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं भारतीय नौदलाकडून सांगण्यात आलं. समुद्री चाचांकडून या भागात अपहरणाच्या घटना घडत असताना. ताज्या घटनेमुळे हा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. लाल सागरातील हालचालींवरही आमच लक्ष आहे, असं भारताने गुरुवारी सांगितलं. या सागरातून मालवाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांना हौथी बंडखोर टार्गेट करत आहेत. समुद्री सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध असल्याच भारतीय नौदलाने आधीच स्पष्ट केलय.