70 ते 80 हिंदू तरुणींना फसवले, नको ते व्हिडीओ, फोटो काढले.. नालासोपाऱ्यातील भयानक प्रकरण समोर

नालासोपारा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका आरोपीने 70 ते 80 तरुणींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? वाचा...

70 ते 80 हिंदू तरुणींना फसवले, नको ते व्हिडीओ, फोटो काढले.. नालासोपाऱ्यातील भयानक प्रकरण समोर
सांकेतिक फोटो
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 8:37 AM

देशात दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. कोणी बायकोला सोडून गर्लफ्रेंडसोबत फिरताना पकडले गेले तर कोणी थेट दुसरे लग्न केले आहे. आता नालासोपारा येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने 70 ते 80 महिलांची फसवणूक केली आहे. त्याने थेट तरुणींचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो शूट केले आहेत. या प्रकरणी सध्या पोलिस तपास सुरू आहे.

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणींवर वारंवार नको ते कृत्य केले असल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघड झाला आहे. एका व्यायाम शाळेत मित्रांसोबत असताना ओळख झालेल्या तरुणाने, पीडित तरुणीशी सुरुवातीला ओळख करुन घेतली. हळूहळू ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. तिला वेगवेगळे आमिष दाखवून, तिच्यासोबत नको ते केले. त्यानंतर तरुणीने हिंमत करुन पोलिसात धाव घेतली.

Loading...

70 ते 80 तरुणींची फसवणूक

या प्रकरणातील आरोपीची चौकशी केल्यानंतर जवळपास ७० ते ८० हिंदू तरुणींना वेगवेगळे आमिष दाखवून, फसवून, त्यांच्यासोबत वाईत कृत्य केल्याचे समोर आले. तर काही तरुणींचे त्याने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काडून त्याचा गैरवापर केला असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

आरिफ अबू शेख असे मुख्य आरोपीचे नाव आहे. आरोपीची आई रुक्शाना, नातेवाईक साहिल खान यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील पीडित महिला ही हिंदू असून आरोपी हा मुस्लिम असल्याने, या प्रकरणात हिदुत्ववादी संघटनांनकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. मात्र याप्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर सत्य समोर येणार आहे. या सर्व प्रकरणात पोलिसांनी मात्र आज दिवसभरात अधिकृत कॅमेरा समोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us